गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – तुमसर – मोहाडी विधानसभेत शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय बजाज नगर तुमसर ” आदर्श मतदान केंद्र “ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू. जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा , लोकांना मतदानाचे महत्व पटावे , मतदानाची टक्केवारी वाढावी, या हेतूने निवडणुक विभागाच्या वतीने तुमसर येथील शारदा विद्यालयाला आदर्श मतदान केंद्र दिल्या गेले. आदर्श केंद्राची संकल्पना प्रत्यक्षात साकार केली प्राचार्य राहुल डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. आकर्षक सभामंडप, फुग्यांचे आकर्षक तिरंगी झुपके ,खाली लाल व हिरव्या चटया ,थंड पाणी ,प्रतिक्षालय,लहान मुलांसाठी पाळणाघर, त्यात त्यांची खिलोने आदींची व्यवस्था करण्यात आली होती. नवरी सारखी सजलेल्या शारदा विद्यालयात मतदारांना प्रवेश करताच लोकशाहीचा महाआनंदोत्सव साजरा होत आहे,अशी प्रथमत: जाणीव झाली. शेल्फी पॉइंट ने मतदारांनी स्वतःची एक शेल्फी काढून आनंदोत्सव साजरा केला.आदर्श मतदान केंद्राच्या प्रवेश द्वारावर चार पहिल्या मतदारांचे रोपटे देवून, अक्षवंत करून व ब्यांड पथकांनी वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मतदार राज्याचा चेहऱ्या वरचा आनंद काही औरच होता. पाळणा घरात लहान मुलांनी मनसोक्त खेळून आनंद लुटला व मतदार आईनी बिनधास्तपणे मतदानाचा हक्क बजावला.बंटी – बबली ठरले आकर्षणाचे केंद्र.त्यांनी 100 टक्के मतदान करण्याचा संदेश दिला.माझा मत ,माझा अधिकार हा फलक दाखवून मतदारांचे केले स्वागत. एका स्वागत कक्षा पासून तर दुसऱ्या स्वागत गेट पर्यंत सुविचारांच्या कुंड्या सजलेल्या होत्या.विशेष म्हणजे आदर्श मतदान केंद्र 197 या केंद्राचे presiding officer आणि polling Officer यांचे विशेष नावाच्या नेम प्लेट्स तयार करण्यात आल्या होत्या.मतदारांनी केंद्रात जाताना व परत येताना या देखावाच्या आनंद लुटला.बंटी आणि बबली सोबत शेल्फी घेण्याची संधी कोणत्याच मतदारांनी सोडली नाही.लोकशाहीच्या आनंद उत्सोवात तरुणा बरोबरच , वयोवृद्ध व नवागत मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. वयोवृद्ध व दिव्यांग मतदारानी व्हीलचेयर बसुन मतदानाचा हक्क बजावला. सेल्फी पॉइंट् ला जावुन मतदानाचा हक्क बजावल्याची सेल्फी काढली.विविध सोशल माध्यमतून सेल्फी झळकवली .मतदारांनी सेल्फी काढून मित्रमंडळींना,नातेवाईकांना पाठवून मतदान बजावण्याचा आवाहन केले.विविध पथकांनी शारदा विद्यालय तुमसर आदर्श मतदान केंद्राचे छायाचित्रे ग्रूपवर टाकताच भंडारा जिल्हा निवडणूक निरीक्षक विजय गुप्ता ( हरियाणा ) यांनी शारदा विद्यालय तुमसर या आदर्श केंद्राला भेट दिली.भरभरून या केंद्राची स्तुती केली.या केंद्राला विशेष प्रमाणपत्र देण्याचे मौखिक उदगार सुद्धा काढले.पाळणा घरात लहान मुले खेळताना त्यांचे छायाचित्रे व संपूर्ण केंद्रातील सजावट आपल्या मोबाईल मध्ये प्रत्यक्षात घेतले.बंटी आणि बबली सोबत छायाचित्र घेतले आणि सेल्फी सुद्धा घेतली.दर्शन निकाळजे उपविभागीय अधिकारी तुमसर,मोहन टिकले तहसिलदार,तुमसर नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा कासम प्यारे ,भंडारा जिल्ह्यातील विविध पथके , पोलीस अधिकाऱ्याची पथके यांनी विशेष भेट देवुन शारदा विद्यालय तुमसर या आदर्श केंद्राची प्रशंसा केली.शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय बजाज नगर तुमसर चे प्राचार्य राहुल डोंगरे आणि त्यांचे सहकाऱ्यांच्या राष्ट्रीय सण नवोपक्रमाची जिल्ह्यात स्तुती होत आहे. हे विशेष.
COMMENTS