गौतम नगरी चौफेर कृष्णा चव्हाण.जिवती-
तालुक्यातील रोडगुडा येथे सुदामभाऊ राठोड यांनी सहजच भेट दिली असता तेथील नागरिकांनी त्यांच्यासमोर वेगवेगळ्या समस्या मांडल्या गावामध्ये लाईटची समस्या रस्त्याची गंभीर अवस्था असे अनेक प्रश्न गावकऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडले राजकीय नेते फक्त मत मागण्यासाठी फिरतात बाकीचे समस्या त्यांना दिसत नाही लोकांना काय त्रास आहे याच्याशी त्यांना काही घेणं देण नाही निवडून आले कि आलेशान थंड ac मध्ये सुस्त होऊन जातात अशी परिस्थिती जिवती तालुक्यातील नेत्यांची आहे. सुदामभाऊ राठोड यांच्या सोबत चर्चा करत असताना उपस्थित रामेश्वर जाधव, रंगराव राठोड, सुरेश राठोड, रामेश्वर वायकुळे, बालाजी अहिरकर, घाशी सय्यद, सुभाष जाधव आदींनी प्रश्न मांडले लगेच सुदामभाऊ राठोड यांनी गट विकास अधिकारी जिवती यांच्याशी संपर्क साधून रोडगुडा येथील जिल्हापरिषद शाळेपासून ते समशान भूमी पर्यंत सिमेंट काँक्रेट रोड व वाढीव लाईट पोल ची मागणी केली आहे.



COMMENTS