गौतम नगरी चौफेर कृष्णा चव्हाण.
जिवती – आज दिनांक 19/08/2025 रोज मंगळवार ला साडेअकरा ते साडेबारा या दरम्यान चंद्रपूर जिल्हा पोलीस चंद्रपूर दलाच्या वतीने राबविण्यात येणारे नशा मुक्त अभियाना अंतर्गत बालाजी हायस्कूल जिवती, विदर्भ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय जिवती, लालीबाई हायस्कूल जिवती, यांच्या वतीने जिवती शहरातील पोलीस स्टेशन जिवती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते वार्ड क्रमांक सहा ची गल्ली ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मरेवाड चौक कुंभेझरी चौक परत मरेवाड चौक येथे व्यसनमुक्ती वर मा. ठाणेदार जाधव साहेब मुख्याध्यापक भगत सर, प्रा.वासाडे सर, निवृत्त पोलिस पाटील वाकडेजी नी व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले. संपूर्ण शहरात रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये पोलीस स्टेशन जिवती येथील तीन अधिकारी व दहा पोलीस अंमलदार तसेच बालाजी हायस्कूल जिवती चे मुख्याध्यापक श्री. नाभिलास भगत सर, व सोबत इतर शिक्षक वर्ग, विदर्भ कनिष्ठ वरिष्ठ विद्यालय जिवती चे प्रा. मुंडे सर व इतर प्राध्यापक वर्ग, लालीबाई आश्रम शाळा चे मुख्याध्यापक आगलावे सर व इतर शिक्षक वर्ग या रॅलीत शेकडो विद्यार्थांनी हातात फलक घेऊन जयघोषासह उस्फूर्त प्रतिसाद दिला. रॅलीमधील सर्व मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक व सर्व विद्यार्थी यांचे मनपूर्वक आभार जिवती पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा. जाधव साहेब यांनी आभार मानले




COMMENTS