शालेय विद्यार्थ्यांची आमदाराकडे आर्त हाक  आम्हाला  शाळेत ये- जा करण्यासाठी चांगला रस्ता मिळणार नाही का हो दादा ?

HomeNewsनागपुर डिवीजन

शालेय विद्यार्थ्यांची आमदाराकडे आर्त हाक  आम्हाला  शाळेत ये- जा करण्यासाठी चांगला रस्ता मिळणार नाही का हो दादा ?

आमदार देवराव भोंगळे यांच्या भूमिकेकडे निर्वाचन क्षेत्रातील जनतेचे लक्ष

अल्ट्राटेक कंपनी व्यवस्थापनाने पालगाव वासियांना दिलेले आश्वासन न पाळ ल्यामुळे आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वात आंदोलनाचा दुसरा दिवस

गौतम नगरी चौफेर //नांदाफाट// कोरपना:-  पालगाववासिय यांच्या मागील सात दशकापासून असलेल्या अल्ट्राटेक माईन्स ते पालगाव पोच मार्गाच्या मागणीला घेऊन अल्ट्राटेक व्यवस्थापनाने रस्ता बांधणी संदर्भात लेखी स्वरूपात दिलेल्या आश्वासनाची परिपुर्तता अल्ट्राटेक सिमेंट व्यवस्थापनाने न केल्यामुळे त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्याकरिता व त्यांना आपल्या कर्तव्याची जाण आणून देण्याकरिता निर्वाचन क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे पालं गाव चे सरपंच अरुण रागीट यांच्या नेतृत्वात संपूर्ण गावकऱ्यांना घेऊन अल्ट्राटेक सिमेंट कारखान्याच्या नांदा फाटा येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ सोमवार पासून ठिय्या  आंदोलनात सुरुवात झाली असून आज दिवसभर विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आंदोलनाचे एक वेगळेच स्वरूप पाहायला मिळाले एवढेच नव्हे तर सहभागी झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दादा आमच्याकरिता शाळेत येण्या जाण्यासाठी का रस्ता कधी मिळणार असा कनवाळू प्रश्न आमदारांपुढे उभा केला याच मागणीला घेऊन मे महिन्याच्या सुरुवातीला सतत तीन दिवस अवकाळी पावसामध्ये आंदोलन केल्या गेले त्याचे परिमिती कंपनी व्यवस्थापनाने उपविभागीय अधिकारी राजुरा यांचा समक्ष ३० मे पर्यंत कामास सुरुवात केल्या जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले मात्र अर्ध्यापेक्षा जास्त जून महिना लोटून गेला असताना सुद्धा रस्त्याच्या कामास किंवा प्रक्रिये सुरुवात न झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष निर्माण होऊन त्यांनी आश्वासनाचे स्मरण आमदार महोदयांना आणून देत सोमवारपासून पुनश्च आंदोलन सुरू झाल्यामुळे शिवाय मुख्य प्रवेशद्वार बंद केल्या गेल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाचे दिवसागणिक करोडो रुपयाचे नुकसान होत आहे यात काही शंका नाही एवढे सगळे असताना कंपनी व्यवस्थापन नकारात्मक भूमिका घेण्यामागचे नेमके कारण कायहाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे एवढेच नव्हे तर मागील दीड वर्षापासून कारखान्यातील अनेक कामगारांना आपल्या कर्तव्यापासून निलंबित केलेले आहे त्यांचा सुद्धा विषय तात्काळ निकाली काढावा कामगारावर होत असलेले अन्याय अत्याचार त्वरित बंद करावे असेही आश्वासन मिळाले होते मात्र या सर्व मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापन जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत असल्यामुळे या सर्व मागण्यांच्या संदर्भात आमदार काय पाहून उचलणार याकडे सर्व राजुरा निर्वाचन क्षेत्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे विशेष म्हणजे रस्त्याच्या मागणीच्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय असल्यामुळे यातच भर म्हणून शालेय विद्यार्थी सुद्धा सहभागी झाल्यामुळे आता आंदोलनाचे स्वरूप नेमके कोणत्या दिशेने जाईल याकडे प्रशासन कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे रस्त्याच्या मागणीच्या संदर्भात तोडगा काढण्याच्या हेतूने स्थानिक प्रशासनाकडून उपविभागीय अधिकारी राजुरा तहसीलदार कोरपणा गडचांदूर ठाणेदार हे कसोशीने प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे मात्र रस्ता बांधून देण्याचे ठोस लेखी आश्वासन व त्वरित रस्त्याच्या कामाला सुरुवात या मागणीवर आमदार ठाम असल्याकारणाने कंपनी व्यवस्थापकाची सध्यातरी दमछाक झालेली आहे दिवसागणिक आंदोलनकर्त्यांची संख्या वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस आंदोलनाचे स्वरूप तीव्र होत असताना दिसून येत आहे हे खरे

COMMENTS

You cannot copy content of this page