गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र) :–: इन्फंट जीजस सोसायटीच्या माध्यमातून संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल, राजुरा येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सवाची सुरुवात गौरदेवीच्या आरतीने झाली. त्यानंतर पारंपरिक गरब्याच्या खेळाने संपूर्ण वातावरण रंगले. या कार्यक्रमात पालक, शिक्षक व विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन सुंदर सादरीकरण केले.

शाळेतील रेड, येल्लो, ब्ल्यू व ग्रीन या चार हाऊस ग्रुपमधील विद्यार्थ्यांनी नऊ देवींचे रूप धारण करून त्यांच्या स्वरूपाची माहिती सादर केली. तसेच नवरात्रीतील नऊ रंगांचे जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांनी मनोगतातून उलगडून दाखविले. प्रत्येक गटाने आपल्या वर्गाची आकर्षक सजावट करून उत्सवाला अधिक रंगत आणली. उत्सवातील धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय परंपरेचे महत्त्व समजावून देण्यात आले आणि नवरात्रीचा उत्सव जल्लोषात साजरा झाला.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, प्रमुख अतिथी सौ. शुभांगी सुभाषराव धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


COMMENTS