आमदार देवराव भोंगळे यांचा आता कामगारांच्या न्याय मागण्यासाठी लढा
अल्ट्राटेक कंपनी व्यवस्थापनाने पालगाव वासियांना दिलेले आश्वासन न पाळ ल्यामुळे आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वात आंदोलनाचा तिसरा दिवस
गौतम नगरी चौफेर (नांदाफाटा) – चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आदिवासी बहुल तालूक्यातील आवारपूर जवळ असलेल्या पालगाव वाशी यांच्या मागील सात दशकापासून असलेल्या अल्ट्राटेक माईन्स ते पालगाव पोच मार्गाच्या मागणीला घेऊन अल्ट्राटेक व्यवस्थापनाने रस्ता बांधणी संदर्भात लेखी स्वरूपात दिलेल्या आश्वासनाची परिपुर्तता अल्ट्राटेक सिमेंट व्यवस्थापनाने न केल्यामुळे त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्याकरिता व त्यांना आपल्या कर्तव्याची जाण आणून देण्याकरिता निर्वाचन क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे पालं गाव चे सरपंच अरुण रागीट यांच्या नेतृत्वात संपूर्ण गावकऱ्यांना घेऊन अल्ट्राटेक सिमेंट कारखान्याच्या नांदा फाटा येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ सोमवार पासून ठिय्या आंदोलनात सुरुवात झाली असून आज आंदोलनाचा तिसरा दिवस सकाळपासूनच आजूबाजूच्या परिसरातील गावातील शेकडो महिला आंदोलन मंडपात उपस्थित झाल्यामुळे आवारपूर अल्ट्राटेक व्यवस्थापनाची दमछाक उडाली सदरच्या मे महिन्याच्या सुरुवातीला सतत तीन दिवस अवकाळी पावसामध्ये आंदोलन केल्या गेले त्याचे परिमिती कंपनी व्यवस्थापनाने उपविभागीय अधिकारी राजुरा यांना जून महिन्याच्या सुरुवातीला कामास सुरुवात केल्या जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले मात्र अर्ध्यापेक्षा जास्त जून महिना लोटून गेला असताना सुद्धा रस्त्याच्या कामास किंवा प्रक्रिये सुरुवात न झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष निर्माण होऊन त्यांनी आश्वासनाचे स्मरण आमदार महोदयांना आणून देत सोमवारपासून पुनश्च आंदोलन सुरू झाल्यामुळे शिवाय मुख्य प्रवेशद्वार बंद केल्या गेल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाचे दिवसागणिक करोडो रुपयाचे नुकसान होत आहे यात काही शंका नाही एवढे सगळे असताना कंपनी व्यवस्थापन नकारात्मक भूमिका घेण्यामागचे नेमके कारण कायहाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत उपविभागीय अधिकारी रवींद्र माने कल्पना तहसीलदार हे दोघेही मालगाव वासियांच्या रस्त्याच्या मागणीच्या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन संयुक्त रीतीने आगामी नोव्हेंबर महिन्यापर्यंत रस्ता बांधून देण्यासंदर्भात होकारार्थी असल्याचे पत्र घेऊन आले असताना आंदोलनात सहभागी प्रामुख्याने लोडर कामगार वर्गामध्ये असलेला असंतोष उखाणाला त्यांनी आपले गाराने आमदारापुढे मांडले व मागील दोन वर्षापासून असलेल्या कामगाराला त्वरित कर्तव्यावर या मागणीने जोर धरला शेवटी ही मागणी सुद्धा हवेतच विकली त्यामुळे आंदोलन चिघळल्याचे स्वरूप पाहायला मिळाले एवढेच नव्हे तर कंपनी व्यवस्थापनाच्या महाप्रबंधकाच्या अ डेल तट्टू धोरणाचा विरोध म्हणून आंदोलनकर्त्यांनी कारखान्याच्या मुख्य आवक जावक प्रवेशद्वारांवर महाप्रबंधक यांच्या निषेधाचे बॅनर सुद्धा धडकवले यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र निर्वाचन क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे हे आपल्या मागणीला घेऊन ठाम असल्यामुळे शिवाय दिवसेंदिवस आंदोलनात वाढणारी संख्या लक्षात घेता आंदोलन कोणत्या दिशेला जाईल मी वेळच ठरवणार कोणती अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस उपविभागीय अधिकारी जाधव यांचे नेतृत्वात ठाणेदार शिवाजी कदम यांनी जिल्ह्यातील अतिरिक्त कुमक मागवीत चौक बंदोबस्त ठेवलेला आहे

80 च्या दशकापासून च्या इतिहासात आज पावे तो विशेष करून एखाद्या गावाच्या विशेष मागणी करता व कामगाराच्या न्याय हक्काकरिता रस्त्यावर उतरणारा हा एकमेव आमदार असून सामान्यांच्या प्रश्नांची जाण त्यांना यथायोग्य आहे अशी जनसामान्य माणसांमध्ये चर्चा दिसून येत आहे

पालगाव चा रस्ता पूर्णत्वासनेने आणि कंपनी व्यवस्थापना अंतर्गत असलेल्या कामगारावर होत असलेले अन्याय अत्याचार त्वरित थांबवणे समान काम समान वेतन या नियमाचे पालन करणे निलंबित कामगारांना त्वरित कामावर घेणे या मागण्यांना घेऊन मी हे आंदोलन सुरू केले असून जनहिताचे काम असल्यामुळे आता माघार नाही जनतेवर व माझ्या निर्वाचन क्षेत्रातील कामगारावर होत असलेले अन्याय अत्याचार मी खपवून घेणार नाही आमदार देवराव भोंगळे राजुरा निर्वाचन क्षेत्र



COMMENTS