तालुका स्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धाचे थाटात उदघाट्न.

HomeNewsनागपुर डिवीजन

तालुका स्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धाचे थाटात उदघाट्न.

– खेळामधूनही साधता येथे विध्यार्थीना प्रगती .- देवराव भोंगळे
गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी राजुरा) – शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारा आयोजित तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2024-2025 राजुरा तालुका स्तरावरील मैदानी क्रीडा स्पर्धाचे उदघाट्न नुकतेच संपन्न झाले. यावेळी उदघाट्क म्हणून देवराव भोंगळे, माजी जी.प. अध्यक्ष तथा भाजपा राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख यांची उपस्थिती होती . तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एन. टी. डाखरे, मुख्याध्यापक, शिवाजी हायस्कुल, चुनाळा यांची उपस्थिती होती . प्रमुख अतिथी म्हणून किशोर रागीट, एस. टी. विरुटकर, तालुका संयोजक, आनंद चलाख, क्रीडा शिक्षक किशोर चिंचोलकर, पी. पी. साळवे, एम. बी. पाकमोडे, भास्कर फरकाडे,पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर, शुभम बन्नेवार, भार्गवी कोंडाली, पियुष सोदारी, ठाकरे, चैताली कन्नाके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. राजुरा तालुक्यातील सतरा वर्ष वयोगटातील मुले व मुली यांची शालेय मैदानी स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. यामधे भालफेक, गोळफेक, थाळीफेक, धावणी, लांब उडी अश्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

राजुरा तालुका स्तरीय क्रीडा वैयक्तिक, सांघिक व मैदानी खेळ दि. 8 ऑगस्ट 2024 पासून राजुरा तालुका क्रीडा संकुल येथे खेळले जात असून यामध्ये दहा प्रकारचे खेळ खेळले जात आहेत.  विध्यार्थीच्या सर्वांगीण विकासात खेळाळूवृत्तीचे अतिशय महत्वाचे स्थान असून शाररिक, मानसिक, बौद्धिक  प्रगती यामुळे साधली जाते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उदघाट्क देवराव भोंगळे यांनी केले. राजुरा तालुक्यात प्रथमच तालुका स्तरावरील विजेत्या खेळाडूना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मेडल देऊन त्यांचा गुणगौरव केल्या जाणार आहे. याकरिता देवराव भोंगळे यांनी पुढाकार घेत सहकार्य केल्याबद्दल त्यांचा संपूर्ण क्रीडा शिक्षकांच्या वतीने शॉल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन भोंगळे यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बादल बेले यांनी केले.

COMMENTS