महायुतीला अल्टीमेटम, सन्मान नसेल तर वेगळा निर्णय घेणार!
युवक आघाडीचा महत्वपूर्ण ठराव
गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी मुंबई) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीने महायुतीत राहण्यासाठी ठाम आणि कठोर भूमिका घेतली आहे.यूवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.पप्पूजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ठराव पास करण्यात आला. ठरावानुसार, महायुतीने 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला योग्य सन्मान आणि जागा दिल्या नाहीत,तर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याची ठाम भूमिका घेतली जाईल.या बैठकीत असा इशारा दिला आहे की महायुतीत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतत दुय्यम स्थान दिले जाणार असेल,तर आम्ही आपल्या मार्गाने जाण्यास तयार आहोत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ.विजयजी मोरे यांनी केले. बैठकीत नेत्यांनी स्पष्ट केले की, आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. महायुतीच्या नेत्यांनी जर आम्हाला राजकीय अस्तित्वाची लढाई लढण्यास भाग पाडले, तर आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ. हा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना व्यक्त करतो आणि आता वेळ आली आहे की महायुतीने हे गांभीर्याने घेतले नाही तर आम्ही आपले वेगळे अस्तित्व दाखवू. बैठकीत राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा. एम. एस. नंदाजी, महाराष्ट्र राज्य संघटन सचिव मा.परशुराम वाडेकरजी, युवक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.स्वप्निल गायकवाड, मा.बापू गायकवाड, मा.विनोद थोरात, संघटक ॲड. मा.उत्तम गायकवाड, मा.उमेश कांबळे, सहसचिव मा.अमोल गायकवाड,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.शैलेश चव्हाण, मुंबई प्रदेश अध्यक्ष मा.सचिनभाई मोहीते,कोकण प्रदेश अध्यक्ष मा.सुशांत भाई सक्पाळ,उत्तर महाराष्ट्र समन्वयक मा.नरेश गवळे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष मा. विनोद जाधव, दक्षिण मुंबई अध्यक्ष रुकेश भालेराव,उत्तर मुंबई अध्यक्ष भाग्यराज परिहार,उत्तर पश्चिम मुंबई अध्यक्ष सुनिल बोर्डे, ठाणे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश निकम, रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडीक, सोलापूर जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब काळे आणि इतर पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीच्या या निर्णयामुळे महायुतीतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हा सोशल मीडिया आयटी सेल 🌀🌀
COMMENTS