– राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन.
– शेकडो शालेय विद्यार्थांची केली आरोग्य तपासणी.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा 1 मार्च
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन उपजिल्हा रुग्णालय राजुरा मार्फत राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 चे उद्घाटन कार्यक्रम राजुरा येथील आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा शाळेत संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक जाधव, वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय राजुरा यांची उपस्थिती होती. तर उद्घाटक म्हणून डॉ. सुवर्णा गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी तर प्रमुख अतिथी म्हणून मनोज गौरकार,गटशिक्षणाधिकारी पं. स. राजुरा, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे, सचिव भास्करराव येसेकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. रश्मी गेडाम, डॉ. पल्लवी खंडाते, डॉ. सुरेंद्र डुकरे वैद्यकिय अधिकारी आर.बी.एस.के., डॉ. शेख मॅडम, श्री जितेंद्र चुदरी, तालुका आरोग्य सहाय्यक, सचिन सातभाई, औषध निर्माण अधिकारी, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, पर्यवेक्षक तथा राष्ट्रिय हरीत सेना विभाग प्रमुख बादल बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी पुणे येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथील राज्यस्तरीय मेळावा आणि उद्घाटन कार्यक्रमाचे आभासीपद्धतीने थेट प्रक्षेपण आदर्श शाळेत दाखविण्यात आले. राज्यातील जिल्हा स्तरावरील 35 तर तालुका स्तरावरील 355 शाळांमध्ये हा उद्घटनीय कार्यक्रम संपन्न झाला. राजुरा तालुक्यांतील आदर्श शाळेची निवड करण्यात आली होती. 0 ते 18 वर्ष वयोगटातील शाळा व अंगणवाडीमधील मुला- मुलींची विनामूल्य आरोग्य तपासणी, जन्मजात आजार व इतर आजारांवर विनामूल्य उपचार, संदर्भ सेवा, शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रोशनी कांबळे यांनी केले. तर आभार ज्योती कल्लुरवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी मडावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेविका अरूणा येमले, सविता तेलंग, उषा मून , प्रनोती माऊलीकर, कमल केंद्रे, संगिता पिपरे, कार्यक्रम सहायक, विक्रम कुरील, लेखापाल, अनिकेत दाते, कीटक तज्ञ, डॉ. हर्षदा ठाकुर, समुदाय आरोग्य अधिकारी, मिरा वजीर आदिंसह आदर्श शाळेतील शिक्षक शिक्षीका, कर्मचारी, राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट गाईड युनिट, विध्यार्थी यांचे सहकार्य लाभले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. व उपस्थीत सर्व विद्यार्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

——————————————–
डॉ. अशोक जाधव, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय राजुरा.
विद्यार्थांच्या सुरक्षित भविष्यासाठी निरोगी बालपण व आरोग्य तपासणी ही काळाची गरज असून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या निमित्याने 0 ते 18 वयोगटातील विद्यार्थांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे त्यामुळें मोठी घटना घडण्यास प्रतिबंध घातला जाईल असे प्रतिपादन डॉ. जाधव यांनी केले.
———————————————
मनोज गौरकर, गटशिक्षणाधिकारी, पं. स. राजुरा
सरकारी योजना, आरोग्य सेवा याकडे दुर्लक्ष न करता विद्यार्थांना निरोगी राहण्यासाठी नियमितपणे आरोग्य तपासणी करीता शाळेतील शिक्षक, पालक व स्वतः विद्यार्थ्यानी जागरूक राहून ती करून घेतली पाहीजेत. शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी हा महत्वाचा कणा असून त्याकरिता आपल्या सर्वांचे सहकार्य व भूमिका महत्वपूर्ण आहे. निरोगी बालपण, सुरक्षीत भविष्य आणि आरोग्याचा ध्यास,महाराष्ट्राचा विकास सर्वांनी मिळून संकल्प केला पाहिजे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी मनोज गौरकर यांनी केले.


COMMENTS