ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक मधुमेह दिवस साजरा

HomeNewsनागपुर डिवीजन

ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक मधुमेह दिवस साजरा

गौतम नगरी चौफेर (वरोरा) – दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ ला जागतिक मधुमेह दिवस साजरा करण्यात आला.मंचावर डॉ प्रतिक दारूंडे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रविण केशवानी दंत चिकित्सक वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी उपस्थितांना मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवायचे काय करायचे काय नाही करायचे याविषयी मार्गदर्शन केले. योगा प्राणायाम, मेडिटेशन, यांचें महत्व समजावून सांगितले. आपल्या दैनंदिन जीवनात आपण आहारावर कसं नियंत्रण ठेवायच हे बघीतले पाहिजे. गोड पदार्थांवर नियंत्रण असायला पाहिजे. झोप चांगली होईल हे बघायला पाहिजे. वंदना बरडे अधीसेवीका यांनी बाॅनर, पोस्टर, फ्लीप चार्ट वापरून मधूमेहाची माहीती दिली. सूत्रसंचालन नेहा ईंदूरकर व आभारप्रदर्शन किरणं साळवे यांनी केले. ऊपस्थीतांना आवश्यक प्रश्नांची उत्तरे दिली.

COMMENTS