नाना पटोले हेच मुख्यमंत्री होणार – मुंबई प्रवक्ता हनुमंत पवार यांचे प्रतिपादन

HomeNewsनागपुर डिवीजन

नाना पटोले हेच मुख्यमंत्री होणार – मुंबई प्रवक्ता हनुमंत पवार यांचे प्रतिपादन

प्रचार रॅलीत नानांनी संपूर्ण साकोली शहरात मोटारसायकल बाईक  चालवून मतदारांना केले आकर्षित

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – साकोली विधानसभा महाविकास आघाडीचे कॉंग्रेस उमेदवार तथा विद्यमान आमदार नाना पटोले यांचा महाराष्ट्रात भव्य जनादेश बघता नानासाहेब हेच मुख्यमंत्री होणार आहे असे प्रतिपादन मुंबईहून आलेले प्रदेश प्रवक्ता हनुमंत पवार यांनी सोमवारी १८ ला भव्य बाईक रॅलीचे समापन प्रसंगी झालेल्या जाहीर सभेत केले. यावेळी मंचावर आमदार नाना पटोले यांचे चिरंजीव राहुल पटोले, पूणे इंटक अध्यक्ष बळीराम डोळे, सांस्कृतिक सेलचे मुंबईतील मयुर कावळे आणि पटोले यांचे जावई रोहन काळभोर हे विशेष करून उपस्थित होते.
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून दमदार प्रचारात आघाडी मिळविणारी महाविकास आघाडीचे उमेदवार आ. नाना पटोले यांचे प्रचारार्थ सोमवारी १८ ला साकोली तलाव वार्ड हनुमान मंदीरातून भव्य बाईक रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली साकोली सेंदूरवाफा शहरातील प्रत्येक प्रभागातून जनआशिर्वाद घेत या रॅलीचे रूपांतर सभेत झाले. सभेत मुंबई व पूणे येथून आलेले अतिथी तथा महाराष्ट्र कॉंग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी भाषणात सांगितले की, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांवर पूर्ण महाराष्ट्राचा पदभार असल्याने यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे आपल्या साकोलीत फारसा वेळ देऊ शकले नाही. पण त्यांच्या प्रचाराला अमरावती, नांदेड, बुलढाणा, उस्मानाबाद, पूणे, मुंबई येथून पदाधिकारी यांनी साकोली विधानसभा क्षेत्रात येऊन जे नानासाहेब यांच्यावर आपुलकीने प्रेम दाखविले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे प्रतिपादन केले. या रॅलीला कॉंग्रेस उमेदवार आमदार नाना पटोले यांनी स्वतः मोटरसायकल चालवित शहर भ्रमण केले. यावेळी सुमारे अडीच ते तीन हजार युवकांची बाईकवर कॉंग्रेसमय झेंडे लावलेली फौज त्यांच्या सोबत होती. सभेला तालुका कॉंग्रेस अध्यक्ष डॉ. अशोक कापगते, जिपस शितल राऊत, शहर अध्यक्ष दिलीप मासूरकर, उपसभापती सरीता करंजेकर, ता. महिला अध्यक्षा छाया पटले, शहर अध्यक्षा पुष्पा कापगते, अश्विन नशिने, मार्कंड भेंडारकर, उमेश कठाणे, मदन रामटेके आदी उपस्थित होते.

COMMENTS