शांतीवन येथे 09 जूनला राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार
गौतम नगरी चौफेर //भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे भंडारा जिल्हा प्रभारी डॉ.अक्षय कहालकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण केल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 09 जूनला शांतीवन बुद्धविहार चिचाळ येथे भव्य स्वागत-सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
पत्रकार डॉ.अक्षय कहालकर यांनी वयाच्या 20 व्या वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सुरूवात केली असून ते आजतागायत अविरत लेखनाचे, बातमी संकलनाचे कार्य सुरू आहे. नागपूर जिल्ह्य़ातील कळमेश्वर येथील पत्रकार श्री. श्रीखंडे यांच्या सोबत “दैनिक सकाळ वृत्तपत्रात” केली. कॉलेज मध्ये शिक्षण घेत असतांना दैनिक सकाळ वृत्तपत्राने “सकाळ युवा समिट” कार्यक्रम आयोजित केला होता, तेव्हापासून पत्रकारितेचे महत्त्व त्यांना समजून आले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे.
पत्रकार डॉ.अक्षय कहालकर यांचे अनेक वर्तमानपत्रात लेख छापून येत असतात. दै. लोकमत, सकाळ, देशोन्नती, माझा मराठवाडा, दै. दंडाधिकार, लोकराज्य, भंडारा एक्स्प्रेस व अशा अनेक वृत्तपत्रात बातम्या व लेख तसेच न्यूज चॅनेलला येत असतात. तळागाळातील जनतेच्या समस्यांना न्याय मिळावा ह्या दृष्टीकोनातून खेड्यापाड्यातील बातम्या प्रकाशीत होवू शकतात असा दृढ निश्चय त्यांच्या लेखणीतून दिसून येतो.
पत्रकार डॉ.अक्षय कहालकर यांच्या 10 वर्षांच्या पत्रकारिता क्षेत्रात कुणालाही न दुखावता किंवा कसलेही आरोप नसलेले व सरळ साध्या मनाने लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शांतीवन येथे 09 जूनला सत्कार करण्यात येणार आहे.
मनोगत
आदर्श पत्रकारिता कशी असावी ही पत्रकार डॉ.अक्षय कहालकर यांच्या कार्यातून बघायला मिळते, पत्रकारिता क्षेत्रात स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून भंडारा जिल्हा प्रभारी डॉ.अक्षय कहालकर यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा….
-संजीव भांबोरे, राज्य सरचिटणीस
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य.

COMMENTS