भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार शिंदे गटातर्फे नरेंद्र भोंडेकर, काँग्रेस तर्फे पूजा ठवकर, अपक्ष नरेंद्र पहाडे यांच्यात रंगणार अटीटटीचा सामना

HomeNewsनागपुर डिवीजन

भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार शिंदे गटातर्फे नरेंद्र भोंडेकर, काँग्रेस तर्फे पूजा ठवकर, अपक्ष नरेंद्र पहाडे यांच्यात रंगणार अटीटटीचा सामना

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – आज दिनांक 18 नोव्हेंबर 2024 ला सायंकाळी 5 वाजता प्रचाराच्या प्रचार तोफा थंडावल्या आणि गावागावात येणारा भोंग्यांच्या कर्कस आवाज आज शांत झाला आणि आता शांततेत गुप्त पद्धतीने उमेदवारांचा प्रचार सुरू आहे . या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेकडून (शिंदे गट) महायुती आघाडी कडून उभे आहेत. महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसच्या पूजा बालू ठवकर( गजभिये) निवडणूक रिंगणात आहेत तर अपक्ष नरेंद्र पहाडे हे सुद्धा या निवडणुकीत आपले नशीब आजमावित आहेत. प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असून आता लोकांच्या बोलक्या प्रतिक्रिया सुरू झालेले आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसचे उमेदवार पूजा बालू ठवकर (गजभिये) व अपक्ष नरेंद्र पहाडे यांच्यात तिहेरी लढत असून  खरी चर्चा सुरू झाली झालेली आहे. विद्यमान आमदार नरेंद भोंडेकर आपला गड राखण्यात यशस्वी ठरतात ? की, काँग्रेसच्या महिला उमेदवार पूजा बालू ठवकर (गजभिये) यशस्वी ठरतात. प्रचारात अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी सुद्धा आघाडी घेतली असून तिहेरी लढतीत आपले नसीब आजमावत आहेत.

COMMENTS