गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे – “भंडारासर्व लहान मोठ्या व्यापारी जनतेच्या पाठीशी साकोली पोलीस खंबीरपणे उभी आहे. आँनलाईन फसवणूकीचे प्रसंग आल्यास तातडीने पोलीसांना सुचना द्यावी त्याची जलदगतीने दखल घेणार” असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद चव्हाण यांनी केले. ते (शनि. १९ जुलै) ला शहरात विदर्भ निधी अर्बन को ऑप बॅंकेच्या आयोजित “व्यापारी मेळावा” प्रसंगी बोलत होते. तर सायबर क्राईमवर व्यापारी बंधूंनी सतर्क व सावधान रहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी याप्रसंगी केले.
साकोलीत व्यापारी जनतेला एक खुला मंच मिळावा. त्यांच्या प्रत्येक आर्थिक स्थितींवर तोडगा काढण्यासाठी विदर्भ निधी अर्बन को ऑप बॅंकेचे अध्यक्ष प्रविण भांडारकर यांनी या व्यापारी मेळाव्याचे आयोजन भारत सभागृहात केले होते. “बिझनेस कॉन्क्लेव्ह २०२५” हे विदर्भ निधी बँकेचा उपक्रमाने या मेळाव्याचे खास उद्देश म्हणजे लहान मोठ्या सर्व व्यापाऱ्यांसाठी हा व्यासपीठ आदान-प्रदान व संवादासाठी एक उत्तम संधी ठरेल हा हेतू होता. याप्रसंगी मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, विदर्भ निधी बॅंकेचे अध्यक्ष प्रविण भांडारकर, प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, सायबर सेल भंडाराचे दिपक खेडीकर, व्यापारी मार्गदर्शक सीए पंकज मुंदडा, गौरव लीचडे, अचल गभने, विधीतज्ञ ॲड. दिलीप कातोरे, पत्रकार संघ अध्यक्ष राजेशसिंह बैस, व्यापारीबंधू राजकुमार मल्लानी, अनिल गुप्ता, तरूण मल्लानी, अनुपम गुप्ता, अशोक मल्लानी, हेमकृष्ण वाडीभस्मे, नेपाल रंगारी, गंगाराम मेश्राम, प्रवीण पटेल, मंदार खेडीकर, प्रकाश रोकडे, निखिल आदमने, विदर्भ निधीचे मुख्य अधिकारी अतुल भांडारकर आदी मान्यवर हजर होते. व्यापारी मेळाव्यात एसडीपीओ आनंद चव्हाण व पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी व्यापा-यांना सायबर क्राईम बाबद जनजागृती करीत सांगितले की, कोणत्याही फसवणूक प्रकरणात जनतेने सतर्क व सावधान रहावे, आँनलाईन फसवणूक लक्षात येताच तातडीने साकोली पोलीसांशी संपर्क साधावा साकोली पोलीस प्रत्येक लहान मोठ्या व्यापारी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असे आवाहन केले. बॅंकेचे अध्यक्ष प्रविण भांडारकर यांनी सांगितले की, शहरातील व्यापारी जनतेच्या प्रत्येक आर्थिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाईल व या समोरील पाच वर्षांत साकोली शहर हे देसाईगंज, गोंदिया या व्यापारी नगरी पेक्षाही बाजारपेठ भरभराटीचे शहर निर्माण करू असे प्रतिपादन यावेळी केले. याप्रसंगी सर्व उपस्थित पाहुण्यांनी अध्यक्ष प्रविण भांडारकर यांचा वाढदिवस मंचावर साजरा करून त्यांना पुढील यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा प्रदान केल्यात. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यगण उपस्थित होते.


COMMENTS