रिपब्लिकन पार्टि आॉफ इंडिया याची विदर्भ सरचिटणीस याच्या अध्यक्षतेखाली गडचांदूर येथे सभा संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

रिपब्लिकन पार्टि आॉफ इंडिया याची विदर्भ सरचिटणीस याच्या अध्यक्षतेखाली गडचांदूर येथे सभा संपन्न

गौतम नगरी चौफेर (शिला धोटे)- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात प्रभाकर खाडे कोरपना तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली.
    दरम्यान या बैठकीमध्ये जिल्हा अध्यक्ष गौतम तोडे यांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात माजी सरपंच शेख रऊफ शेख चमन गडचांदूर यांचा रिपाई (आ मध्ये पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी त्यांची स्वतंत्र उमेदवारी जाहीर करण्यात आली.
       या आता या गडचांदुर शहरामध्ये निवडणुकीला एक वेगळेच हवा चालू झालेली आहे.आणि आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. कारण शेख रऊफ शेख चमन हे गडचांदुर मध्ये समाजकार्यात अग्रेसर आहेत, त्यांची गरिब जनतेशी अगदी जवळिक गोळ सबंध आहेत तसेच त्यांचा परिचय हा लोकनेत माजी सरपंच गडचांदुर असा आहे.
           

या सर्व प्रकारामुळे निवडणुकीत सर्व प्रस्थापित उमेदवारात खडबड उडाली आहे. या वेळी या बैठकीला रिपाईचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष गौतम तोडे तर रिपाईचे विदर्भ प्रदेश महासचिव अशोकजी घोटेकर तसेच कोरपना रिपाईचे तालूका अध्यक्ष प्रभाकर खाडे, रिपाईचे तालूका महासचिव गौतम धोटे, गौतम भसारकर, चंद्रमणी डोंगरे, प्रा रामराव पुनेकर, रिपाईचे कोरपना संघटक शेषराव शिलारकर, सुरजभाऊ उपरे, अनवर खान पठान, संतोष जाधव, सौ.रंजना संतोष जाधव, मारोती वानखेडे यांच्या सह शेख रऊफ शेख चमन आणी विनोदजी खाडे, किशोरभाऊ डोंगरे आदि  रिपाईचे कार्यकर्ते उपस्थीती दरम्यान उमेदवारीसाठी परिपूर्ण तयारी सुरू आहे.
एकंदरीत स्थिती पाहता निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाची बाजू मजबूत राहील, हे आताच बोलले जाऊ शकत नाही. राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अनेक माजी पदाधिकारी व नवीन चेहरे अॅक्टीव्ह मोडवर आले आहेत. नागरिकांच्या गाठीभेटी घेणे, त्यांच्या अडचणींना धावून जाणे, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणे आदी कामे जोमाने सुरू केले या दरम्यान आम्ही सर्व रिपाईचे कार्यकर्ते या निवडणूकिच्या मौदानात आलोत आणी ही निवडणुक आम्ही जिंकू असा आशावाद  आशोकजी घोटेकर आणी जिल्हा अध्यक्ष गौतम तोडे यांनी बोलून दाखवला या
पक्षाच्या मोरचेऺबांधनित गाडचांदूरात बोलत होते

COMMENTS

You cannot copy content of this page