गौतम नगरी चौफेर (प्रमोद कोडापे) दिनांक 26.9.2025 रोज शुक्रवार ला नियोजन भवन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज भारतीय जनता पार्टी अनु. जमाती मोर्चा(आदिवासी आघाडी) व जनजाती सुरक्षा मंच चंद्रपूर जिल्हा यांचे तर्फे सध्यस्थितीत आदिवासी आरक्षणावर इरत गैरआदिवासी हे आदिवासी आरक्षणाची मागणी करताना दिसून येत असल्यामुळे, आदिवासीच्या आरक्षणाला कुठेही धक्का नं लागता व घुसखोरांची घुसखोरी न होऊ देता आदिवासी समुदायांचे आरक्षण हे जेसे थे स्थितीत अबाधित रहावे या मागणीचे निवेदन व इतर मुद्य्यांचे निवेदन आज चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राचार्य डॉ. ना. श्री. अशोकजी उईके, आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी मंत्री, आमदार देवरावदादा भोंगळे व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मार्फत राज्याचे मान. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सादर करण्यात आले.

यावेळी भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या महामंत्री कु.अल्काताई आत्राम,अरुणजी मडावी जिल्हाध्यक्ष अनु.जमाती मोर्चा ग्रामीण चंद्रपूर(आदिवासी आघाडी)धनराज कोवे चंद्रपूर महानगर माजी अध्यक्ष तथा सहसंयोजक जनजाती सुरक्षा मंच चंद्रपूर, प्रमोद कोडापे महामंत्री, अशोक आलाम महामंत्री,अभय मडावी महामंत्री, वर्षा परचाके उपाध्यक्षा जमाती मोर्चा चंद्रपूर मनोज तुमराम ता. अध्यक्ष जमाती मोर्चा कोरपना, दत्तू कोरवते ता. अध्यक्ष बल्लारपूर जमाती मोर्चा,सागर धुर्वे, सोशल मीडिया, मंगल भांदीकर सामाजिक कार्यकर्ते, जिल्ह्यातील आदी भाजपा जमाती मोर्चा चंद्रपूर जिल्हा चे व जनजाती सुरक्षा मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते.




COMMENTS