गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा –1 जुलै 2025 ला साकोली तालुक्यातील एकोडी येथे राजर्षी शाहू महाराज कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया येथील विद्यार्थीनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण जागरूकता कार्यानुभव ( RAWE+SPW )उपक्रमांतर्गत महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन केले.
ग्रामपंचायत एकोडी येथील सरपंच एस. वी. खोब्रागडे यांच्या अनुमतीने शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ व स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने वृक्षारोपण व कृषी विषयक जनजागृती कार्यक्रम पार पडले. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, मृदा आरोग्य व हवामान बदलासंदर्भातील माहिती दिली गेली. यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय एकोडी येथील प्राध्यापक लांजेवार आणि शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
या उपक्रमामार्फत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ग्रामस्तरावर कार्य करत ग्रामीण भागातील कृषी समस्या व उपाय योजनांची माहिती घेतली. या उपक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी रीना पारधी, करीना गावटकर, मोनाली कोरे ,चांदणी अंबुले, नोमीन भंडारी, दिव्या इनवटे , यांनी सहभाग नोंदविला होता.

COMMENTS