विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तुमसर तालुक्याची मासिक सभा उत्साही वातावरणात संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तुमसर तालुक्याची मासिक सभा उत्साही वातावरणात संपन्न

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तुमसर तालुका व शहर यांची मासिक सभा दिनांक 3 जुलै 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता एक्सलट क्लासेस येथे संपन्न झाली .या सभेचे अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष रंजन कुमार डे हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून पंजाब राठोड, मनोहर कापगते, अनंत जायभाये तसेच मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांचा समावेश होता. यात प्रामुख्याने जिल्हा कार्यकारणीच्या सभेतील सूचना व कामकाजाचे विवरण सभासदांना देण्यात आले, जिल्हा अधिवेशनासाठी निधी संकलनाचा जमाखर्च अहवाल सादर करण्यात आला ,तालुका मेळाव्याचे आयोजन लवकरच करण्याबाबत चर्चा करण्यात आली, तालुका व शहर कार्यकारणीच्या पुनर्गठनावर सर्वसमावेश विचारविनिमय करण्यात आला ,संघाचे स्वतंत्र बँक खाते उघडण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला, सर्व विषयांवर चर्चा करीत सर्व सदस्यांनी सकारात्मक  एकमताने निर्णय घेतले, सदर बैठकीला जे बी कडव ,रोहित मरसकोल्हे,राहुल पसीने, किशोर बोंद्रे ,के बी हुमे ,टी एस यादव ,संजय लेनगुरे, एम .डी .शिंगाडे,तसेच अनेक शिक्षक सदस्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page