आमदार देवराव भोंगळे; गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रमात गुणवत्ता यादीत आल्येल्या राजुरा शहरातील मुस्लिम समाजातील मुलींनाचा आमदार देवराव भोंगळे यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. त्यावेळी कौतुकाची थाप देताना सांगितले की, स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिद्द आणि मेहनतीसोबत अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते असा आशावाद व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

शहरातील मुस्लिम समाजातील सीमा फतिमा मोहम्मद साबीर शेख यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून प्रथम एम. एससी केमिस्ट्री या विषयात गोंडवाना विद्यापीठातून प्रथम आली तर सुहाना मुझिब शेख गोंडवाना विद्यापीठातून विज्ञान शाखेतून (बीएससी) तिसरी मेरिट आल्याबद्दल आमदार देवराव भोंगळे यांनी त्यांच्या घरी जाऊन शाल, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी नरसिंह भूपेल्ली, सय्यद शहजाद अली, बाबा बेग, प्रफुल घोटेकर, सक्षम अंबाडे, शब्बीर शेख, कलीम बेग, नदीम बेग, सोयाब मुजीम शेख, रियाज शेख, प्रलय मसादे, सागर भटपल्लीवार यांचेसह पालक वर्ग उपस्थित होते.


COMMENTS