आरोग्य उप केंद्र गोवरी यांच्या अंतर्गत शाळेमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन

HomeNewsनागपुर डिवीजन

आरोग्य उप केंद्र गोवरी यांच्या अंतर्गत शाळेमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – राजुरा तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात चिंचोली (खुर्द ), महर्षि उत्तम स्वामी महाराज कमवि चिंचोली (खुर्द), सावित्री बाई फुले मुला – मुलींचे वसतिगृह तथा महात्मा ज्योतिबा फुले वृद्धाश्रम चिंचोली ( खुर्द ) येथे आरोग्य उप केंद्र गोवरी येथील डॉ शिलकुमार दुधे, अजर काझी, श्रीमती एस एस शंभरकर यांनी आरोग्याबद्दल  विद्यार्थांना व वृद्धवहीन महिलांना मार्गदर्शन करून त्यांची तपासणी केली. या शिबिरामध्ये विद्यार्थी तथा वृद्ध महिलांनी अतिशय सुंदर असा प्रतिसाद दिला व आपली तपासणी करून आयोजकांचे आभार मानले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक रुपेश सोळंके चिंचोली गावातील  उपसरपंच विजय मिलमिले व शाळेतील शिक्षक  रवींद्र गोरे, अरविंद ढवळे,संतोष वडस्कर, सुधीर मुनघाटे, प्रवीण गुडपल्ले, अशोक पवार, कपिल बोपनवार, साहिल सोळंके, शिक्षिका रेश्मा शेख, मालू टोंगे, साधना डाहुले, उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page