संत तुकाराम सभागृह भंडारा येथे विविध ओबीसी संघटनेची सभा संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

संत तुकाराम सभागृह भंडारा येथे विविध ओबीसी संघटनेची सभा संपन्न

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – आज दिनांक  28 सप्टेंबर 2024 ला संत तुकाराम सभागृह भंडारा येथे विविध ओबीसी संघटनांची बैठक सदानंद ईलमे  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .येत्या 5 ऑक्टोबर 2024 ला ओबीसी संवाद यात्रा भंडारा येथे दुपारी 1 वाजता येणार असून त्या अनुषंगाने ही बैठक करण्यात आयोजित करण्यात आली होती. ओबीसी समाजाकरिता  21 दिवस 
उपोषण करणारे रवींद्र टोंगे यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी येणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजूरकर आणि प्रमुख वक्ते ऋषभ राऊत हे भंडारा येथे येणार आहेत . 5 ऑक्टोंबर  सभा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 वाजता सभा आयोजित करण्यात आलेली आहे.  सभेमध्ये ओबीसी जन गण परिषद, ओबीसी सेवा संघ ,राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,ओबीसी जागृती मंच, संविधान संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे . यावेळी ओबीसी सेवा संघाचे गोपाल सेलोकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुकेश पुडके, माजी शिक्षणाधिकारी के झेड शेंडे ,भगीरथ धोटे, बाळकृष्ण सार्वे, वामन गोंधळे , संविधान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अध्यक्ष रोशन जांभुळकर , माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे , उमेश सिंगनजुडे, रोशन उरकुडे, अरुण लुटे, भावराव साळवे, विष्णुदास  गुणवंत पंचबुधे, मोरेश्वर तिजारे, बंडू गंथाळे , संजीव भांबोरे, अरुण गावंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते, यावेळी संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर यांनी सदर प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले की, अनुसूचित जातीचे जे आश्रम शाळा आहेत त्यांना मागील पंधरा वर्षापासून अनुदान मिळाले नसल्याने खंत व्यक्त केली. त्याचप्रमाणे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी अनुसूचित जातीच्या आश्रम शाळा बंद पाडण्याचा शासनाचे छडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे .

COMMENTS