गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी अशोककुमार उमरे गडचांदूर) – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आयोजित स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया या पक्षाचा स्थापना दिवस येत्या ३० सप्टेंबर २०२४ रोजी ठिक ४:00 वाजता मातोश्री विमलाताई देशमुख सभागृह शिवाजी नगर अमरावती येथे संपन्न होत आहे इतिहासात प्रथमच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा स्थापना दिवस अमरावती येथे साजरा होत असल्याने या मेळाव्यास विशेष महत्व आहे या दिवशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे मतदार पुनर्बांधणी चा निर्धार करणार आहेत या निर्धार मेळाव्यास महाराष्ट्र तथा अन्य राज्यातील विचारवंतांना आमंत्रित केले आहे या मेळाव्याचे उद्घाटन भंते कल्याणमित्र ज्ञानज्योती चंद्रपुर करणार तर मुख्य मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच बुद्धमय भारताचे क्रांती विज्ञान या शोधग्रंथा चे लेखक प्रसिद्ध रिपब्लिकन विचारवंत बौद्धांच्या ओबीसी आरक्षणाचे प्रवक्ते मा रमेश जीवने यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्धार मेळावा होणार दिल्ली येथील आंबेडकरी विचारवंत मा अशोक भारती जेष्ठ विचारवंत जावेद पाशा आवाज इंडिया चॅनल चे डायरेक्टर प्रितम कुमार बुलकुंडे रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक अशोक कुमार ऊमरे मोरेश्वर नगराळे विचारवंत या मेळाव्यास उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. या निर्धार मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयु अतिश डोंगरे, किशोर मोहोड अभिजीत अभ्यंकर मनोज थोरात सागर गवई सुरेश शहारे शरद रोडगे लोकेश मेश्राम प्रा अशांत रंगाची सिद्धार्थ गेडाम डॉक्टर निर्मल सरदार अमोल सोनटक्के राजकुमार मेश्राम देवानंद लांजेवार यांनी केले आहे चला निर्धार करूया बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उभा करूया खुप झाले पक्षोपक्ष अपक्ष आता एकच लक्ष बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष
COMMENTS