अब्दुल गणी पटेल विद्यालय देवाडा येथे वृक्षारोपण तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.

HomeNewsनागपुर डिवीजन

अब्दुल गणी पटेल विद्यालय देवाडा येथे वृक्षारोपण तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – ६ जुलै दिनांक ४ जुलै  रोज शुक्रवारला बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळ राजुरा द्वारा संचालित अब्दुल गणी पटेल विद्यालय देवाडा तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय देवाडा येथे संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ पथाडे यांच्या वाढदिवसानिमित्त  शालेय पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व पाहुण्यांच्या हस्ते तथा सर्व विद्यार्थ्यामार्फत वृक्षारोपण करण्यात आले व “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना वृक्षाचे महत्त्व पटवून देण्यात आले. वसुंधरा संवर्धनासाठी कशाप्रकारे पर्यावरण संतुलित राखणे आवश्यक आहे याचे महत्त्व अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. फेब्रुवारी, मार्च २०२५ च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. यात अब्दुल गणी पटेल विद्यालय देवाडाचे प्रथम तीन विद्यार्थी साक्षी सोनुले, पूजा गुरनूले, शबनम शेख तसेच इयत्ता बारावी मधील प्रथम तीन विद्यार्थी नेहा शेख, मेघा कोल्हे व कृष्णा जाधव या सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळ राजुरा चे संस्था अध्यक्ष सिद्धार्थ पथाडे, सचिव गिताताई पथाडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर रायपुरे, ईश्वर देवगडे, सिद्धार्थ रणवीर, पालक प्रतिनिधी मनोहर जाधव, संस्थेच्या सदस्या स्नेहा देव, शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गिरसावळे, क.म.वि. चे प्राचार्य प्रदीप उपरे सहायक शिक्षक हिनेश जाधव, रमेश राठोड, शिक्षिका दुर्गाश्री वाढई, निलिमा सूर व शिक्षकेत्तर कर्मचारी आकाश ढवळे, प्रेमदेव मत्ते, संदीप डाहूले, मारोती गव्हारे आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page