महिला शिक्षिकांची वडाचे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी.

HomeNewsनागपुर डिवीजन

महिला शिक्षिकांची वडाचे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी.

– निवड व वरीष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण दरम्यान सुलभक ज्योती गुरनुले (शेंडे) यांचा पुढाकार.

गौतम नगरी चौफेर राजुरा १० जुन – आज संपूर्ण देशात वटपौर्णिमेचा उत्साह बघायला मिळत असतानाच अनेक महीला शिक्षीकांची निवड व वरीष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण सूरू असल्याने या प्रशिक्षणाच्या विश्रांती वेळेत सुलभक ज्योती गुरनुले (शेंडे ) यांनी पुढाकार घेऊन उपस्थीत सर्व महिला शिक्षीकांच्या सहकार्याने इन्फट जिजस इंग्लीश पब्लिक स्कूल येथील परीसरात वडाच्या झाडाचे वृक्षारोपण केले. दिनांक २ जुन ते १२ जुन पर्यंत हे प्रशिक्षण असून राजुरा , कोरपना, जिवती तालुक्यांतील विवीध शाळांमधील शिक्षकांची येथे प्रशिक्षण सूरू आहे. इन्फट शाळेच्या मुख्याध्यापिका यांची परवानगी घेऊन या परीसरात हे वडाचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच त्या वृक्षाचे जतन, वाढ,संवर्धनाचा संकल्प सुद्धा घेण्यात आला. एकीकडे आपले नोकरीचे कर्तव्य बजावत असताना पर्यावरण संवर्धन व जनजागृती करीता ज्योती गुरनुले (शेंडे ) यांनी पुढाकार घेतल्याने प्रशिक्षणार्थी महिला शिक्षिकानी या वृक्षलागवडीत आवडीने सहभाग नोंदविला आहे. याकरिता राजुरा पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी मंगला तोडे, प्रशिक्षण समन्वयक सावन चालखुरे, विस्तार अधिकारी , गट क्रमांक १ चे सुलभक यांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे हे वडाचे झाडं गुरनुले यांनी घरच्या कुंडीत संगोपन करून मोठे केले आणि त्याच वडाच्या वृक्षाचे वटपौर्णिमे निमित्याने वृक्षारोपण केले.

COMMENTS

You cannot copy content of this page