HomeNewsनागपुर डिवीजन

गडचांदूर–कोरपना मार्गावर भीषण अपघात

हनुमान मदीर लाल गुदा

तरुणीचा जागीच मृत्यू; दोन युवक गंभीर जखमी

गौतम नगरी चौफेर बादल बेले कोरपना : गडचांदूर–कोरपना राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान लालगुडा फाट्या जवळील हनुमान मंदिराजवळ घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०४ एफआर ८७४६ या क्रमांकाची स्कार्पिओ गाडी रस्त्यावर उभी असताना एमएच ४० बीजे ७३३९ या क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. या धडकेत वैशाली शामराव कोयचाडे (२५ वर्ष) हिचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक प्रेम लक्ष्मण कोवे (२२, वर्ष) आणि करण सुनील पंधरे (१६, वर्ष) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन तातडीने चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

COMMENTS

You cannot copy content of this page