जनजातीय गौरव दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न.

HomeNewsनागपुर डिवीजन

जनजातीय गौरव दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न.

– भगवान बिरसामुंडा यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा २३ सप्टेंबर
          प्रकल्प अधिकारी  विकास राचेलवार  यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत श्रीमती गोपीबाई सांगडा पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा राजुरा, शासकीय मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह राजुरा आणि सोनिया गांधी निवासी शाळा राजुरा यांच्या सौजन्याने भगवान बिरसामुंडा यांची १५० वी जयंती निमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रम दि. २३ सप्टेंबर  ला श्रीमती गोपीबाई सांगडा पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा राजुरा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका छाया श्याम मोहितकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून  तहसीलदार डॉ.ओमप्रकाश गौंड, अरुण मडावी व प्रमोद कोडापे (जनकल्याण समिती सदस्य ), संस्थेचे पदाधिकारी लक्ष्मीबाई जाधव, संस्थाध्यक्ष लखन जाधव , सचिन डोहे, डॉ. कुळमेथे , पोलीस कॉंस्टेबल राजुरा मयुरी कुळमेथे, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गोहोने, पांडुरंग पिसे, जिवनदास किन्नाके, जे. एल.गाजर्लावार, एस. एल. तलारे, कु. पी. आर. हिरडे, व्ही. एस. दवंडे, गट साधन केंद्र राजुरा ची संपूर्ण टिम, पालक वर्ग तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. त्यानिमित्त प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जनजाती गौरव दिवसावर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये नृत्य स्पर्धा, वारली पेंटिंग, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तहसीलदार डॉ.ओमप्रकाश गोंड यांनी  बिरसामुंडा यांच्या कार्याविषयी आणि अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जनकल्याण समिती सदस्य अरुण मडावी आणि प्रमोद कोडापे यांनी बिरसामुंडा यांच्या कार्याचे गुणगान करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एस. निमसडे  यांनी केले.  मुख्याध्यापिका छाया श्याम मोहितकर  आणि प्राथमिक मुख्याध्यापक डी.टी.खोब्रागडे यांनी सर्वांचे आभार मानले.

COMMENTS

You cannot copy content of this page