शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवाडा येथे मकर संक्रांत दिनानिमित्त सर्व शिक्षक व विध्यार्थ्यानी वृक्षारोपण व झाडाचे वाण देऊन आगळी वेगळी साजरी केली संक्रांत.

HomeNewsनागपुर डिवीजन

शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवाडा येथे मकर संक्रांत दिनानिमित्त सर्व शिक्षक व विध्यार्थ्यानी वृक्षारोपण व झाडाचे वाण देऊन आगळी वेगळी साजरी केली संक्रांत.

गौतम नगरी चौफेर (सुवर्णा बादल बेले राजुरा) – २० जानेवारी
     शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवाडा येथे मकर संक्रांत दिनानिमित्याने वाण मनुन वृक्ष देऊन वृक्षारोपण करुन संक्रात साजरी करण्यात आली. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या कोरपणा तालुका महिला अध्यक्षा उषा टोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम शाळेतील मुख्याध्यापिका संध्या रिंगने यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून विजय रोहनकर यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व  विद्यार्थ्यांनी आंब्याचे झाडाची कलम तसेच इतर फुलझाडे यांचे वाण वाटप केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला उपस्थित रवींद्र जाधव, गौरव अंमलपूरीवार, अविनाश मेश्राम, जाधव, मिथुन उसेंडी, मनिष उंबरकर, सोमवंशी, शुभम बाटवे, वैशाली सातपुते, स्वाती कुर्वे, किरण भालेराव, स्वाती पडवेकर, चव्हाण आणि स्नेहा गजभीये, दर्शना लखोटे ,अंजली कोंगरे, मडावी बाबू आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणरफ़वार  केले तर प्रास्ताविक नाईक यांनी केले. तर आभार प्रदर्शन  वैभव वैरागडे यांनी मानले. कार्यक्रमात सामूहिकरित्या वृक्ष रोपन करुन वृक्ष सवर्धन यावर जनजागृती करण्यात आली.

COMMENTS

You cannot copy content of this page