रवी भवन नागपूर येथे संयुक्त रिपब्लिकन आघाडीची सभा संपन्न
गौतम नगरी चौफेर (नागपूर (संजीव भांबोरे) – एकच लक्ष्य रिपब्लिकन ऐक्य या मागणीला धरून संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ प्रदेशच्या वतीने आज दिनांक 9 ऑक्टोंबर 2024 ला रविभवन नागपूर येथे विविध गटात विभागलेल्या आंबेडकरी जनतेने एकत्रितपणे येऊन निवडणूक लढवावी व मताचे विभाजन टाळावे याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अमृतजी गजभिये होते. मुख्य संयोजक प्राध्यापक प्रदीप बोरकर, मुख्य अतिथी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, निमंत्रक दिनेश गोडघाटे ,सयोजक कैलास बोंबले ,संयोजक दिनेश अंडरशहारे, बाळू कोसमकर (मामा) उत्तर नागपूर उपस्थित होते.समजा नेते एकत्र येत नसतील तर त्यांची जागा जनतेने दाखवून द्यावी अशाप्रकारे सदर बैठकीत निर्णय घेण्यात आला व संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या वतीने उत्तर नागपूर व भंडारा विधानसभेची निवडणूक लढण्यासंबंधी सुद्धा चर्चा करण्यात आली. या सभेत विविध गटात विभागलेल्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन आंबेडकरी जनतेच्या मतांचे विभाजन टाळावे .लोकशाही ,गणतंत्र बळकट करावे याकरिता प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. समजा नेते एकत्र येत नसेल तर जनता त्याची जागा दाखवेल असे सुद्धा प्रमुख वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. यावेळी बाळू कोसमकर (मामा), प्रकाश कुंभे ,राज सुखदेवे, हंसराज मेश्राम,प्राध्यापक सुरेश खोब्रागडे, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, रोशन जांभुळकर, साहित्यिक अमृत बनसोड ,रमेश पाटील, महादेव गोडबोले, शेषराव गणवीर, रमेश फुले, सूर्यभान शेंडे, संजीव भांबोरे, यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता दिलीप वानखडे, विजय भोवते, राजेश मडामे, ज्ञानचंद जांभुळकर , गोपीचंद्र अंभोरे, दिलीप वानखेडे, सुधाकरराव टवळे, रमेश गेडाम, चुडामन हटवार, मनोहर गायकवाड, कुंदाताई जांभुळकर, सुनील झोडापे, डॉक्टर चरणदास जनबंधू , शेषराव गणवीर यांनी सहकार्य केले.
COMMENTS