नागपूर येथील रिपाइंचा वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळाव्या निमित्त थुट्रा येथे प्रचारसभा

HomeNewsनागपुर डिवीजन

नागपूर येथील रिपाइंचा वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळाव्या निमित्त थुट्रा येथे प्रचारसभा

गौतम नगरी चौफेर – नागपूर येथील रिपाइंच्या वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळाव्याला लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद दाखवून द्या- जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे नागपूर येथे दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ ला दुपारी १२ वाजता स्थळ- अमृत भवन, नार्थ अंबाझरी रोड, युनिव्हर्सिटी वाचनालयाजवळ नागपूर येथे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर प्रदेश आणि नागपूर शहर द्वारा आयोजित वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन आणि अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई आहेत.

राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे, राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. प्रा. अजितसिंह चहल, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जकप्पा कांबळे, गुजरात राज्य सरचिटणीस गोविंदभाई पधीयार, रिपब्लिकन विचारवंत रमेश जीवने, नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे, नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, नागपूर प्रदेश सरचिटणीस प्रशांत ढेंगरे इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत सदर वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न होत आहे. उपरोक्त वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळाव्याच्या प्रचारार्थ रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ ला दुपारी एक वाजता मौजा थुट्रा येथे प्रचार बैठकीचे आयोजन करण्यात आले. या प्रचार बैठकीला रिपाइंचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला संबोधित करताना जिल्हाध्यक्ष यांनी  नागपूर येथील रिपाइंच्या वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळाव्याला लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद दाखवून द्या. असे जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे यांनी आवाहन केले.

नागपूर प्रदेश उपाध्यक्ष नेताजी बुरचुंडे, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, जिल्हा संघटक अशोककुमार उमरे, युवा अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर खाडे, गौतम भसारकर, बल्लारशा अध्यक्ष अजय चव्हाण, ऍड. प्रियांका चव्हाण, अश्विन दुबे, संतोष धोटे, चंदू ताडे, इत्यादींनी स्थानिक समस्यांवर समयोचित विचार व्यक्त केले. बैठकीच्या सुरूवातीला थुट्रा येथील महामानव डॉ बाबासाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी पाहुणे मंडळींनी पुष्प, अगरबत्ती मेणबत्ती लावून त्रीशरणं पंचशील घेण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे हिरीरीने सहभागी होऊन काम करणारे थुट्रा येथील विजय चुनारकर, जगदीश धवने, राजेंद्र चुनारकर, गोविंदा इंगोले, बोधकीर्त नरवाडे, नितेश रामटेके यांचा तसेच जगदीश धवने यांची जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याबद्दल जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे यांनी सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितेश रामटेके, संचालन जिल्हा संघटक अशोककुमार उमरे आभार प्रदर्शन जिल्हा युवा अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांनी केले कार्यक्रमास हंसराज ताकसांडे उपरवाही,‌ मिरा डहाके, सुप्रिया अमोल ठेंगरे, वैशाली विजय चुनारकर, सिमा रविंद्र चुनारकर, अंजू सुंदर देठे, रत्नमाला युवराज चुनारकर, सपना राहुल बारसागडे, सुनिता गौतम मून, पुष्पा बाबाराव चुनारकर, संध्या आतिश निरंजने, नंदिनी तत्वशील कांबळे, कविता लोमेश वाकडे, मनिषा गौतम वनकर, इंदुबाई ताराचंद देठे, सागरबाई कांबळे, निर्मला सुभाष नरवाडे, लक्ष्मीबाई भिमराव इंगोले, सुखमारबाई कांबळे, रंजना गणपत चुनारकर, भागरथाबाई दाहाडे, भिमराव वाघमारे, अमोल ठेंगरे, जगदीश धवने, राजेंद्र चुनारकर, राजकुमार नरवाडे, गौतम मून, मारोती झोडे, नामदेव चुनारकर, रामदास रामटेके, मुन्ना मेश्राम, विजय, जयशीला मनोहरे, पुजा नरवाडे, गोविंदा इंगोले, रमा राजेंद्र चुनारकर, प्रविण नरवाडे इत्यादींनी कार्यक्रम आयोजित करण्यात मोलाचे योगदान दिले.

COMMENTS

You cannot copy content of this page