चंद्रपूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक संपन्न.
गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे गडचांदूर) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूरची बैठक १४ सप्टेंबर २०२५ रोज रविवारला दुपारी १२ वाजता स्थळ- पी डब्ल्यू डी रेस्ट हाऊस, सवारी बंगल्यासमोर, नागपूर रोड चंद्रपूर येथे घेण्यात आली. पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. नेताजी बुरचुंडे, सिद्धार्थ सुमन, माजी जिल्हाध्यक्ष गोपाळ रायपूरे, अशोककुमार उमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली-
१) चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीबाबत चर्चा करणे.
२) तालुका कार्यकारिणीबाबत चर्चा करणे.
३) महानगर पालिका अध्यक्ष आणि कार्यकारिणीबाबत चर्चा करणे.
४) महानगर प्रभाग प्रमुखाबाबत चर्चा करणे.
५) १५ आणि १६ आक्टोंबर २०२५ दीक्षाभूमी कार्यक्रमाबाबत चर्चा करणे.
६) अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषयावर चर्चा करणे.
बैठकीच्या सुरूवातीला मोरेश्वर चंदनखेडे यांची चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीस चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, बल्लारशा, कोरपना, गडचांदूर, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा, सावली इत्यादी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत जिल्हा कार्यकारिणीतील संभाव्य पदाधिकारी यांच्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक तालुक्यातील तालुका निमंत्रितांची नेमणूक करण्याचे ठरविण्यात आले आणि निमंत्रितांना कार्यकारिणी गठित करण्यासाठी लवकरात लवकर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्याचे सुचित करण्यात आले. सदर बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने आगामी ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या संदर्भात साधकबाधक चर्चा करण्यात आली.
निवडून येणाऱ्या संभाव्य जागेवर स्वबळावर उमेदवार उभे करून निवडणूकीला सर्व ताकदीनिशी सामोरे जायचे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. बैठकीत कोमल रामटेके, गुरूदास रामटेके, विजय उराडे पोभुर्णा, आनंद ताकसांडे चंद्रपूर, चंदु देवाजी ताडे गडचांदूर, संतोष रामटेके भद्रावती, पत्रूजी दुर्गे, जगजीवन बोरकर गडचांदूर, छाया लभाने, विजय रामटेके ब्रम्हपुरी, सतीशराज रामटेके, अनिल खोब्रागडे, जनार्दन वाघमारे, अजय पाटील, संतोष धोटे, अजय चव्हाण, प्रा. जे.टी. लोणारे, रामदास रामटेके उपरवाही, नितेश रामटेके थुटरा, बोधकिर्त नरवाडे थुट्रा, मारोतराव रामटेके, रामटेके, हंसराज ताकसांडे उपरवाही, गोविंद इंगोले थुट्रा, जगदीश धवने थुट्रा, अनिल वानखेडे, पुरुषोत्तम वैद्य, अरुण देवगडे इत्यादींनी बैठक यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.




COMMENTS