पोलिसांनी केली कारवाई
गौतम नगरी चौफेर हकानी शेख
जिवती:- तालुक्यातील पिट्टीगुडा पोलीस स्टेशन हद्दीत अनेक गावात अवैध दारू, अवैध गांजा व इतरही अवैध धंदे जोमात सुरू असून याकडे संबंधित पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याचे वर्तमानपत्रात, पोर्टलवर, युट्युब वर, सोशल मीडियाचे माध्यमातून बातम्या प्रकाशित करण्यात आले तरीपण या परिसरात संबंधित पोलीस प्रशासनाच झोपेतच असल्यामुळे! महिला मंडळांनी गावात अवैध धंदे कोणालाही करु द्याचे नाही असे ठाम ठरवून आज दि.२८ ऑगस्ट रोजी पल्लेझरी या गावातील अवैध दारू विक्रेता गोविंद जाधव याला पकडण्यात आले त्या अवैध दारू विक्रेत्याकडून देशी दारूचे ४९ पव्वे मिळाले, पिट्टीगुडा पोलीस ठाण्याचे पिएसआए विष्णू भांडवले यांना फोन करून माहिती दिली . त्या दारू विक्रेत्याला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. अपराध क्रं.१३ कलम महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. देशी दारू ४९ निपा एकुण अंदाजे किंमत २४५० येवढी आहे.



COMMENTS