उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समता सैनिक दलाच्या नागपूर येथील परेड ला भेट दिली

HomeNewsनागपुर डिवीजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समता सैनिक दलाच्या नागपूर येथील परेड ला भेट दिली

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे नागपूर- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समता सैनिक दलाच्या नागपूर येथील परेडला भेट दिली.आणि एसएसडी विषयी उस्तुकतेने माहिती विचारली. यावेळी समता सैनिक दल विषयी आणि उपवर्गीकरण क्रेमिलेयर हे संविधान विरोधी आहे अशे एड .स्मिता कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधताना सांगितले. उपवर्गीकरन करण्यासाठी राज्य सरकारने गठित केलेली अनंत बदर समिती त्वरित रद्द करण्यात यावी आणि क्रिमिलेयर विरोधी करण्यात येत असलेली चर्चा देखील थांबवावी अशी जोरदार मागणी समता सैनिक दलाच्या एड स्मिताताई कांबळे, विश्वास पाटील, आनंद पिल्लेवान, राजेश लांजेवार, टार्झन ढवळे, अरुण भारशंक, सहित समस्त समता दलाच्या सैनिकांनी आज दिक्षाभूमी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.
या विषयावर समता सैनिक दलाच्या शिष्टमंडळांना आपण माझ्यापर्यंत या सविस्तर चर्चा करू अस अश्वासीत एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी समता सैनिक दलाच्या शिष्टमंडळाने समता सैनिक दल संपादित भारतीय संविधानाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

COMMENTS

You cannot copy content of this page