५ सप्टेंबरला राजुऱ्यात शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सुदर्शन निमकर मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

HomeNewsनागपुर डिवीजन

५ सप्टेंबरला राजुऱ्यात शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सुदर्शन निमकर मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार सुदर्शन निमकर मित्र परिवाराच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त राजूरा, कोरपणा, गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळा, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सत्कार समारंभ ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वा. जिम्नॅशियम हॉल, देशपांडे वाडी राजुरा येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे राहणार असून नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, परभणीचे माजी आमदार विजयराव गव्हाणे, माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे आणि विमाशिचे माजी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष केशव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा येथे महाआरती, ८.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, तर सकाळी ९ वाजता राजुरा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे.
सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर दुपारी १ वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध उपक्रमांना नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार सुदर्शन निमकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page