नगरपरिषदेने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा प्रभाग क्रमांक एक मधील रहिवाश्यांनी केली मागणी

HomeNewsनागपुर डिवीजन

नगरपरिषदेने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा प्रभाग क्रमांक एक मधील रहिवाश्यांनी केली मागणी

गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार – कोरपना तालुक्यातील येत असलेल्या गडचांदुर येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये गल्लोगल्लीत मोकाट कुत्र्यांचा कळप इकडून तिकडे तिकडून ईकडे धावताना दिसते, या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांचा व ईतर कुणाचाच काहीच फायदा नाहीं उलट लहान मुलांना व परिसरातील नागरिकांना या कुत्र्यापासून धोका निर्माण झाला असून अनेक नागरिकांना चावा घेतला आहे,गायरान कुत्रे व डसरे कुत्र्यांनि चावा घेतला तर पाच ते दहा इंजेक्शन घ्यावे लागतात व लहान मुलांना चावले तर अख्या कुटुंबाला याचा परिणाम भोगावे लागत असुन मानसिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे, जर एखाद्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला कुत्रा चावला तर आठ दहा दिवस ती व्यक्ती कामाला जाऊ शकत नाही त्यामुळे त्याला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावे लागते, करीता मोकाट कुत्रा चावणाऱ्या व्यक्तीच्l मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईचा विचार नगर परिषदेने करावा, आणि मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांचा व लहान मुलांचा नाहक बळी जाण्या आधी नगर परिषदेने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा जर कुत्र्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, असे नगर परिषदेला वाटत असेल तसा विचार नक्की करावा मात्र मोकाट कुत्र्यांमुळे कुणाचा मानसिक आणि आर्थिक नुकसान होत असेल तर तर ज्या व्यक्तीला कुत्रा चावला त्याला नगर परिषदे कडून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रभाग क्रमांक एक मधील रहिवाशी रत्नाकर मथुलकर प्रवीण जेणेकर, पांडुरंग ईडे बापुराव काळेगुरवार नाना आरके शंकर भगत बाळा कोडापे इत्यादी नागरिकांनी केली

You cannot copy content of this page