विदर्भातील लोक कलावंतांचा पांडेचेरी उत्सवात राष्ट्रीय स्तरावर सन्मान

HomeNewsनागपुर डिवीजन

विदर्भातील लोक कलावंतांचा पांडेचेरी उत्सवात राष्ट्रीय स्तरावर सन्मान

“नालंदा लोककला मंचच्या कलावंतांची यशोकीर्ती “

‎गौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण देशभ्रतार (जिल्हा प्रतिनिधी) भंडारा :- भारत सरकारच्या दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र तंजावर, सांस्कृतिक मंत्रालय विभागाच्या वतीने भारताचे केंद्रशासित प्रदेश असलेली पांडेचेरी येथे राष्ट्रीय स्तरावरील फेड डे पांडेचेरी या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात  देशातील १९ राज्यांच्या लोक कलावंतांनी आपआपल्या लोककला सादर केल्या. या प्रसंगी.मुख्यमंत्री एन. रंगस्वामी, राज्यपाल के. कैलासनाथन कला व संस्कृती मंत्रालय विभागाचे पी. आर. एन. तिरुमुरूगन यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांसमोर प्रादेशिक लोक नृत्याचे सादरीकरण करून,सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
‎  या कार्यक्रमात भंडारा नजिकच्या दवडीपार येथील नालंदा लोककला मंचचे  संचालक सुशील खांडेकर यांच्या नेतृत्वात लोककलेला आपली मातृभूमी ही विविध कला गुणांनी नटलेली असल्याने दुर्गम भागातील कलावंतांना एकत्रित करून नालंदा लोक कला मंच च्या माध्यमातून, भंडारा, गडचिरोली चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, नागपूर सारख्या तळागाळातील कलावंतांना राष्ट्रीय स्तरावर कला प्रदर्शित करायची संधी उपलब्ध करून देन्यात आली.
‎  दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारच्या माध्यमातून विदर्भातील कलावंतांनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले या वेळी सुशील खांडेकर, वंदिश नगराळे, बेबीलता खांडेकर, मेघा करकाडे, उद्देश कामिडवार, खोमेश बोबाटे, योगेश ससंकर, कृष्णाली पोटावी, दिव्या भोयर , रोमा  भैसारे, संजय देवरे, महेश वाढई , सौरभ गेडाम, कल्याणी शेडमाके सोनू बुरडे, इत्यादि कलावंतांनी पारंपारिक वाद्यांच्या वापर करून प्राचीन, परंपरागत लावणी लोकनृत्य आणि कोळी लोक नृत्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करून 19 राज्यातील लोककलावंता समेत देश विदेशातून आलेल्या परदेशी पर्यटकांची मन जिंकून घेतली.
‎                      या कलावंतांचे कला व संस्कृती मंत्रालय भारत सरकार च्या वतीने पी. आर. एन. तिरुमुरूगन यांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र व पारंपारिक सन्मान चिन्ह देऊन महाराष्ट्राच्या मातीतील या कलावंतांचे सत्कार करण्यात आले.
‎                 महाराष्ट्राच्या मातीतील या कलावंतांना प्रोत्साहन मिळावं आणि जगाच्या पाठीवर त्यांचं नावलौकिक व्हावे या उदात्त हेतूने डॉ. अरुण कुमार डांगे, डॉ.आश्लेषा विनायक रोडगे, डॉ. सुचिता विनोद घडसिंग, डॉ.महेंद्र गणवीर, डॉ.मनीष शेंडे, दवडीपारचे सरपंच राज किरण मेश्राम आणि जिल्ह्यातील  ग्रामस्थांनी पुढील वाटचालीकरिता सदिच्छा देऊन अभिनंदन केले.

COMMENTS

You cannot copy content of this page