राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; वाहतूक व्यवस्था विस्कळीत

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; वाहतूक व्यवस्था विस्कळीत

गौतम नगरी चौफेर //बादल बेले राजुरा : राजुरा – तेलंगणा मार्गावरील सुमठाना फाट्याजवळ गुरुवार ला दुपारच्या सुमारास धानाने भरलेला ट्रक पलटल्याची घटना घडली. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. विशेषतः मोठ्या अवजड वाहनांची आणि बससेवेची मोठी गैरसोय झाली.

अपघातानंतर ट्रक मधील धानाचे पोते रस्त्यावर विखुरले गेले होते. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक अडकून राहिली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने त्यांनी काही धानाची पोती बाजूला केली आणि चारचाकी वाहनांना मार्ग करून दिला. परिणामी, हलकी वाहने मार्गक्रमण करू शकली, मात्र ट्रक, बस आणि इतर अवजड वाहने तिथेच अडकून पडली होती.

या अपघातामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागले. काही प्रवासी पर्यायी मार्गांचा वापर करून गंतव्यस्थानी पोहोचले, तर काहींना दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली. घटनेमुळे स्थानिक पातळीवर वाहतूक व्यवस्थेची पुन्हा एकदा कसोटी लागली असून, अशा अपघातांच्या वेळी अधिक तत्पर आणि सुसज्ज यंत्रणेची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page