समाजाच्या उत्थानााठी सहयोग चे कार्य प्रेरणादायी – सुभाष ताजने

HomeNewsनागपुर डिवीजन

समाजाच्या उत्थानााठी सहयोग चे कार्य प्रेरणादायी – सुभाष ताजने

– सहयोग मल्टी स्टेट क्रेडिट को ऑफ सोसायटीचा एक हात मदतीचा उपक्रम.
– आदर्श व महात्मा ज्योतिबा फुले शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांना मोफत कपडे वितरण.

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी राजुरा) – 26 नोव्हेंबर
          सहयोग मल्टी स्टेट क्रेडिट को – ऑफ. सोसायटी लि. शाखा राजुरा मार्फत ” एक हात मदतीचा ” या उपक्रमा अंतर्गत स्थानिक आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा शाळेतील पन्नास गरजू विद्यार्थ्यांना मोफत कपडे वितरण कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा या शाळेतली सावित्रीबाई फुले सांस्कृतीक सभागृहात आयोजीत कऱण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष ताजने, सचिव, ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणुन सहयोग मल्टी क्रेडिट को ऑफ सोसायटी लिमिटेड चे अमिश तराळे, रिजनल मॅनेजर, पंकज पोहनकर, डिस्ट्रिक्ट हेड, प्रतीक जुवारे, एरिया डिस्ट्रिक्ट हेड, समरेश चौधरी, प्रशांत बी. पाटील, मुख्याध्यापक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा, नलिनी पी. पिंगे, मुख्याध्यापिका, आदर्श विद्यालय, बादल बेले, राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमूख तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, श्रीरंग ढोबळे, शहर अध्यक्ष, नेफडो, लीना साठवणे, वैभव ढोबळे, सहयोग शाखा राजुरा व्यवस्थापक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन मोहनदास मेश्राम सहाय्यक शिक्षक तथा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष नेफडो व तालुका प्रमूख गुरुदेव सेवा मंडळ यांनी केले. प्रास्ताविक अमिश तराळे यांनी तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक प्रशांत पाटील यांनी मानले.” पे बॅक टु सोसायटी” या तत्त्वावर काम करणाऱ्या सहयोग च्या १३५ शाखा असुन समाजातील प्रत्येक घटकातील आर्थिक उन्नती सोबतच शिक्षण व आरोग्य क्षेत्रात या सोसायटी मार्फत कार्य सुरू आहे. वृक्षारोपण, कपडे वितरण हा उपक्रम सोसायटीच्या १३५ ही शाखामध्ये नियमितपणे सुरू आहे. २०१४ मधे गोंदिया जिल्ह्यातून सुरुवात झालेल्या शाखांचा विस्तार २०२१पासून वाढायला लागला. चंद्रपूर जिल्ह्यात दहा तालुक्यात सहयोग च्या शाखा आहेत. स्वतः आर्थिक संपन्न होउन समाजाला मदतीचा हात देण्याचे सामाजिक दायित्व ही सहयोग सोसायटी जपत आहे. त्यामूळे समाजाच्या उत्थानासाठी सहयोग चे कार्य प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन सुभाष ताजने यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताच्या संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. तर कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रवंदनने कऱण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहयोग मल्टी स्टेट क्रेडिट को ऑफ सोसायटी लिमिटेड शाखा राजुरा च्या पदाधिकारी, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

COMMENTS