साकोलीत कार्यकर्ता मेळावा आता हा लढा तीव्र करणार पटोलेंचे प्रतिपादन
गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा(जिल्हा प्रतिनिधी) – कॉंग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी कॉंग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भाजपा व निवडणूक आयोगाच्या संगनमताने लोकशाहीची क्रृर थट्टा केली आहे. तर यावर कॉंग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढणार आणि हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आमदार नाना पटोले यांनी साकोलीतील भारत सभागृहात ( शनि. ३० नोव्हें. ला ) कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दिला.
साकोली माझी मायभूमी आहे. येथील जनतेचे माझ्यावर अफाट प्रेम आहे. जो आशिर्वाद येथील जनतेने मला दिला तो लाख मोलाचा आहे. पण आम्ही नेहमी अन्यायाच्या विरोधात आहोत. एकीकडे भाजपाने निवडणूक आयोगासोबत संगनमत करून “ईव्हीएम घोटाळा” करीत जणू लोकशाहीची क्रृर हत्या केली आहे. येथील शासकीय यंत्रणा भाजपमय झाली आहे, व निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे व आता महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष शांत बसणार नाही, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही देणार” असे आमदार नाना पटोले यांनी येथे प्रतिपादन केले. आयोजित कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात आमदार नाना पटोले यांचा महिला कॉंग्रेस कमिटी व महाविकास आघाडी कडून पुष्पहार घालून जाहीर सत्कार करण्यात आला. यात पंचायत समिती सभापती गणेश आदे, जि. प. स. शितल राऊत, शेतकरी कॉंग्रेस नेते डॉ. अजयराव तुमसरे, उपसभापती सरीता करंजेकर, तालुकाध्यक्ष डॉ. अशोक कापगते, शहराध्यक्ष दिलीप मासूरकर, अश्विन नशिने, महिला कॉंग्रेस तालुकाध्यक्षा छाया पटले, शहराध्यक्षा पुष्पा कापगते, दिलीप निनावे, विजय साखरे, जितेंद्र नशिने, सोनू थानथराटे, लिलाधर पटले, मार्कंड भेंडारकर, कृष्णा हुकरे, उमेश कठाणे, चंद्रकांत वडीकार, माधूरी रासेकर, सविता झनक लांजेवार, विनायक देशमुख, ओमप्रकाश गायकवाड, उमेश भुरे, विक्की राऊत, जावेद शेख, सोनू बैरागी, प्रकाश कुरंजेकर, केशव भलावी, झांशीराम मडावी, मोहनिश खान, सचिन राऊत यांसह साकोली तालुक्यातील हजारो कार्यकर्ते येथे उपस्थित होते.
COMMENTS