गोंदिया जिल्ह्यातील शिवशाही एसटी बस अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून १० लाख तर केंद्र शासनाकडून 2 लाख रुपयांची मदत

HomeNewsनागपुर डिवीजन

गोंदिया जिल्ह्यातील शिवशाही एसटी बस अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून १० लाख तर केंद्र शासनाकडून 2 लाख रुपयांची मदत

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शोक व्यक्त


गौतम नगरी चौफेर (मुंबई( संजीव भांबोरे) : भंडाऱ्याकडून गोंदियाकडे सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास शिवशाही एसटी बस जात असताना दुपारी 1 वाजेच्या सुमारास वाहकाचा नियंत्रण सुटल्याने सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा गोंदिया मार्गावरील डव्वा ,खजरी गावाजवळ वृंदावन फाट्याजवळ एका वळणावर गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी जवळ शिवशाही एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांनी सुद्धा मृतकांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये व जखमींना 50 हजार देण्याचे जाहीर केले. या अपघातात 11 व्यक्ती मरण पावली पावली असल्याचे प्राथमिक अंदाजात नमूद करण्यात असल्याचे कळते. 10 प्रवासी गंभीर जखमी आहेत तर 15 प्रवासी किरकोळ जखमी असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून कळते. जखमीवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी दिली.

अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS