गौतम नगरी चौफेर (हसंराज धोटे) : भौतिक सुखाच्या या काळात माणुसकीची जाण ठेवणारी माणस दुर्मीळ झालीत. पण या व्यवस्थेत संवेदनशील माणसांनीच समाजव्यवस्थेची नाळ कायम ठेवली आहे. त्यांचीच प्रेरणा समाजासाठी ऊर्जा तर देतेच सोबत प्रेमाची भावही देऊन जाते. आपल्या जिवाची बाजी लावून माणीकगढ आताची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी येथील नोकरी गमावून स:ता गडचांदूर येथील ऐतीहासीक बुध्दभुमीची जागा व जीव मुठीत घेवून वाचविणारे युवा कार्यकर्ते गौतम भसारकर यांचे कार्य या संपूर्ण प्रकाराची अनुभूती देतात, असे प्रतिपादन मुंबई येथील सामाजीक कार्यकर्ते अशोकजी उमरे यांनी केले.

गडचांदूर येथील ऐतिहासीक बुध्दभुमी येथील धम्माध्वजदिन समारोहदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते उपासक –उपासिकांना मागील माहीती सांगत — बोलत अशोक उमरे होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष-आयु. अशोककुमार उमरे (रिपाई महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तर कार्यक्रमाचे उदघाटक-आयु. श्रावणजी जीवने (अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा कोरपना तालुका ,जिल्हा चंद्रपूर) प्रास्ताविक – आयु. गौतम भमारकर (पंचशील युगप्रवर्तक बहुहितकारी संस्था हरदोना खु) कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष -आयु. सुरज उपरे (संस्थापक /अध्यक्ष अनैशा वाहनचालक कामगार संघटना हरदोना जी चंद्रपूर) प्रमुख मार्गदर्शक- प्रा.डॉ. सोमाजी गोंडाणे, प्रा. डॉ. विद्याधर बनसोड साहित्यिक तथा आंबेडकरी विचारवंत), विवीध पक्षातिल कार्यकर्त्या व आंबेडकरी विचारवंत चंद्रपूर), आयु. मधू वावनकर (सामाजिक कार्यकर्ते तेलंगणा), आयु. अपेक्षा पिंपळे (सामाजिक कार्यकर्ते), आयु.जी. एस. कांबळे (सामाजिक कार्यकर्ते), आयु. रमेश पाटील सर, आयु, चांगदेव उपरे, आयु. सोमाजी मुन, आयु. भीमदास गायकवाड, आयु. अजय मानवटकर (कामगार नेते), आयु, उत्तमराव बालखंडे, सूत्र संचालन-आयु. भानुदास पाटील यांनी केले तर आभार आयु. किशोर डोंगरे यांनी केले यावेळी या कार्यक्रमाचे छायचिञ गौतम नगरी चौफेरचे संपादक शिला धोटे यांनी घेतले, आयोजक जोगाई तथा बुद्धभूमी विकास व संवर्धन समिती, गडचांदूर अध्यक्ष आयु. दशरथ डांगे ,कार्याध्यक्ष आयु. प्रभाकर खाडे, उपाध्यक्ष आयु. प्रकाश भसारकर, आयु सचिव . किशोर डोंगरे, सहसचिव आयु. पंडित डोंगरे, कोषाध्यक्ष आयु. प्रा. भानुदास पाटील व अगद दुसऱ्या सत्रात सकाळी ११ : ०० वाजता भदंत धम्मसारथी मुख्य धम्म प्रशिक्षक, धम्म प्रशिक्षक भंते राहुल, धम्म प्रशिक्षक भंते राहुलबोधी, धम्म प्रशिक्षक बुद्धवंश बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्धीस्ट सेमिनारी नागपूर यांनी धम्मदेसना दिली.यावेळी समाज क्रांती आघाडी चंद्रपूरचे जिल्हा अध्यक्ष सागर बोरकर व अन्य मान्यवर.
यांची उपस्थिती होती.तालुका कोरपना, जिवती, राजुरासह गावातून समाजातील नेते युवा कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.



COMMENTS