मुंबई दादर येथील  रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी रेल्वे स्टेशन नाव द्या

HomeNewsनागपुर डिवीजन

मुंबई दादर येथील  रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी रेल्वे स्टेशन नाव द्या

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल द्वारे निवेदन

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे मुंबई – भारतातील व देश विदेशातील करोडो लोकांचे  मुंबई दादर येथील येथील भारतीय संविधानाचे निर्माते बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले पवित्र स्मारक करोडो लोकांचे प्रेरणास्थान  आहे. त्यामुळे दादर येथील रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी रेल्वे स्टेशन नाव देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार  व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी ई-मेलद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केलेली आहे. सविस्तर वृत्त असे की ,मुंबई दादर येथील चैत्यभूमी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र स्मारक असून तेथे त्यांची अस्थि समाधीत आहेत. हे ठिकाण दादरच्या शिवाजी पार्क जवळ असून समुद्र  किनाऱ्यावर नैसर्गिक ठिकाणी आहे. तेथे भव्य प्रवेशद्वारावर अशोक स्तंभाची प्रतिकृती आणि बुद्धाची मूर्ती आहे. जिथे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोच्या संख्येने गर्दी होत असते आणि हे ठिकाण शांत व पवित्र स्थळ आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page