HomeNewsनागपुर डिवीजन

जन सुरक्षा विधेयक म्हणजे लोकशाही अधिकारावर घाला –  हंसराज शेंडे

समाज क्रांती आघाडीची बैठक संपन्न

गौतम नगरी चौफेर (संजय इंगळे अकोला प्रती) – व्यक्ती व संघटनांना बेकायदा ठरवण्याचे अमर्याद अधिकार राज्य सरकारच्या हातात देणाऱ्या जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात समाज क्रांती आघाडी या सामाजिक संघटनेच्या वतीने शासकीय विश्रामगृह अकोला येथे समाज क्रांती आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

राज्य सरकार शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हा कायदा करत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षामध्ये सरकारच्या धोरणाविरुद्ध  संघर्ष करणाऱ्या व आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेच्या विरोधात, या विधेयकामुळे सरकारच्या हातात कारवाईचे बेसुमार अधिकार एकवटणार आहेत. सरकारी धोरणांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनांना राज्य सरकार बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावर कारवाई करु शकणार आहे. दोन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा व अशी व्यक्ती, व्यक्तीचे नातेवाईक व अशा संघटनांच्या मालमत्ता जप्त करण्याचे अमर्याद अधिकार या विधेयकाच्या अन्वये राज्य सरकारला प्राप्त होणार आहेत. राज्य सरकारच्या धोरणांची व निर्णयांची कोणत्याही प्रकारची चिकित्सा करणे यामुळे अशक्य होऊन जाणार आहे.

सरकारला विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर या कायद्यान्वये कारवाई होणार केवळ राजकीय पक्ष किंवा संघटनाच नव्हे तर पत्रकार, बुद्धिजीवी, कवी, लेखक, यूट्यूब चैनल असे कुणीही सरकारच्या धोरणाची चिकित्सा करू शकणार नाही. सरकारला विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर सरकार या कायद्यान्वये कारवाई करू शकणार आहे. संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकारावर हा घाला आहेच, शिवाय सर्व प्रकारच्या अभिव्यक्तींचा संकोच करणारी ही कृती आहे. समाज क्रांती आघाडी यांच्या पुढाकाराने या विरोधात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या विधेयकाच्या विरोधात समाज क्रांती आघाडी च्या वतीने लवकर भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना, पत्रकार संघटना, या विधेयकाला विरोध करणारे राजकीय पक्ष, यांनी या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून सर्व सामाजिक संघटना, पत्रकार संघटना, या विधेयकाला विरोध करणारे राजकीय पक्षांनी या मोर्चात सहभागी होण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे असे सुध्दा कळविण्यात आले आहे. या बैठकीला
गोपाल धारपवार, बंडू दादा वानखडे, संदीप खंडारे, सुदाम शेंडे, शांताराम दांडगे, अमर वासनिक, सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे, सुनील वानखडे, शेखर वर्घट, दर्शन वर्घट, राहुल गवई आदि समाज क्रांती आघाडी चे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर बैठकीचे आयोजन शिलवंत वानखडे, संजय इंगळे यांनी केले होते.

COMMENTS

You cannot copy content of this page