अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या मोहाळी तालुका अध्यक्षपदी  प्रविण जावळकर यांची नियुक्ती.

HomeNewsनागपुर डिवीजन

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या मोहाळी तालुका अध्यक्षपदी  प्रविण जावळकर यांची नियुक्ती.

गौतम नगरी चौफेर  श्रीकृष्ण देशभ्रतार
भंडारा :- प्राप्त माहिती अनुसार मोहाळी तालुक्यातील ग्राम जाबं येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत चे माजी शिक्षण सभापती प्रविण जावळकर यांची नियुक्ती अखिल “भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना” (संपूर्ण भारत) च्या मोहाळी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती “अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटने” चे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व “अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटने “चे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी लेखी-पत्र व शाल श्रीफळ देऊन नियुक्ती केलेली आहे. प्रविण जावळकर  हे  दिव्यांग सामाजिक चळवळीत सक्रिय कार्यकर्ता असून .त्यांनी तालुक्यातीलशाळा शिक्षण समितीवर असताना विद्यार्थी, शिक्षकांच्या समस्या मार्गी लावून माझी शाळा सुंदर कशी होईल हे ग्रामवासीयांना लक्षवेधी काम केले.व तालुक्यातील  लोकांच्या अनेक समस्या शासनापुढे निवारण करण्याचे प्रयत्न करत, त्यांनी दिव्यांगाच्या तालुक्या स्तरावर अनेक कार्यक्रम घेऊन समस्या मार्गी लावण्याचे कार्य केले.

त्यांच्या निवडीचे संपूर्ण तालुक्यात  होत,असून त्यांना निवडीचे पुढच्या वाटचालीसाठी नियुक्तीपत्र देऊन शाल श्रीफळ सत्कार करण्यात आला. उपस्थितांमध्ये संघटनेचे संस्थापक सचिव समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार, मोहाळी तालुका अध्यक्ष प्रवीण जावळकर, सामाजिक कार्यकर्ता दिलीप बुर्डे, साप्ताहिक जनता की आवाज चे टेलिग्राफर हर्षवर्धन देशभ्रतार, तर सामाजिक कार्यकर्त्या व संघटनेच्या.राष्ट्रीय अध्यक्षिका मंजुषा देशभ्रतार, प्रमोद बेलेकर, ज्येष्ठ पत्रकार दिगंबर देशभ्रतार,सतीश जीवतोडे इतर अनेक संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.अभिनंदन व शुभेच्छा दिल्या .

COMMENTS

You cannot copy content of this page