गौतम नगरी चौफेर //संतोष पटकोटवार // कोरपना येथे अनेक वर्षापासुन बूरूड समाज वासतव्य करीत आहे हिरव्य। बांबू पासुन विविध प्रकारचया वस्तू तयार करून आपल्या कूटूंबाचे पालन-पोषण करने हां त्यांचा पारंपरिक व्यवसाय असल्याने त्यांना हिरव्य। बांबूची नेहमी गरज पड़त असते ,परंतु चंद्रपुर जिल्ह्यातील वनात बांबू वर रोगराई आल्याने सर्व बांबू वाळून गेला असून बूरुड समाजातील कारागिरापुढे जिवन जगणयाचा प्रश्न निर्माण झाला आहे,अशातच वनविभागाकडुन संवलती दरात पूरवठा होणारा हीरवा बांबू वनविभागाने पुर्णता बंद केल्याने बूरूड कारागिरावर ऊपासमारीची वेळ आली आहे, अवघया काही दिवसातच शाळा /कालेज सूरू होत असल्याने महागळे पूसतके व नोटबुकची व्यवस्था कशी करता येईल ही चिंता पालकांना भेडसावत होती, या रिमझिम पावसामध्ये हाताला काम नसलयाने चिंतेचा पारा डोकयावर चढू लागला असताना चंद्रपुर नगर बुरुड समाजा तरफे कोरपना येथील बूरूड कारागिरांचया मुलांना शालेय नोटबुक व पूसतके वाटप करून एक ऊतम असा उपक्रम राबवून पालकांना टेंशन मुक्त केल्याने विद्यार्थ्यी व पालकांमधये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन चंद्रपुर नगर बूरूड समाजाचे अध्यक्ष सुनील दर्शनवार , चंद्रपुर जिला संपर्क प्रमुख ऍड दिपांजली मंथनवार, नगर बूरूड समाजाचे अजय चांदेकर ,पंकज जोरगेवार स्वप्निल पटकोटवार , यांचे हस्ते नोटबुक व पूसतके वाटप करण्यात आली असून कोरपना बूरूड समाजाचे अध्यक्ष पवन बूरेवार, रामलाल मादेवार, दत्ता चिलगिलवार,शंकर बोमिडवार, संतोष पदमगिरवार धर्मा माजरे,व ईतर मान्यवरांची प्रामुखयाने उपस्थिति होती*


COMMENTS