गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे नागपूर) – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा गौरव वाढवणारी अभिमानास्पद घटना शिर्डी येथे घडली असून सिल्लोड तालुक्यातील केर्हाळा येथील भूमिपुत्र, शाहिरी परंपरेचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व व समाजप्रबोधन करणारे आदर्श शाहिर शाहिर रत्न दादाराव शामराव जाधव यांना ‘साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय पातळीवरील हा पहिला भव्यदिव्य पुरस्कार सोहळा दि. १० जानेवारी २०२६ (शनिवार) रोजी शिर्डी येथील साईबाबांच्या पावन भूमीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सुदाम संसारे सर, उपाध्यक्षा सौ. विध्या ताई ठाकुर (मुंबई), सल्लागार डॉ. माधव वानखेडे, लावणी साम्राज्ञी आकांक्षा कुंभार (सांगली), रंजना ताई बालसाने (मुंबई), सूत्रसंचालिका कु. अश्विनी ताई गोसावी, राजनंदिनी ताई अहिरे (नाशिक), मिनाक्षी ताई अहिरे (रायगड), अभिनेत्री दुर्गाताई बावके (शिर्डी), अभिनेता आकाश वाघमारे (शिर्डी), खलनायक महेश लोखंडे (कोल्हार), आरती ताई बारवर्से (जळगाव), अभिनेता योगेश पवार (मुंबई), उपसंपादक गोकुळसिंग राजपूत (सावळदबारा), ईश्वर हिवाळे पहूर, प्रवीण ठाकरे जिल्हा अध्यक्ष अजिंठा, उपशिक्षक शंकर भामेरे पहूर, मुरलीधर विठ्ठल दाभाडे, जिल्हा अध्यक्ष गजानन काळे खुपटा,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाहिर दादाराव जाधव यांना मानाचा फेटा, शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले. मुख्य निवड समितीचे आयोजक सुदाम संसारे सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अभिमान असलेल्या शाहिर दादाराव जाधव यांच्या समाजप्रबोधनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे.” ‘साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार’ मिळाल्याने शाहिर दादाराव शामराव जाधव यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध सामाजिक, सांस्कृतिक व संघटनात्मक स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

COMMENTS