संविधानाने दिलेले अल्पसंख्याकांचे हक्क जपणे काळाची गरज… प्राचार्य राहुल डोंगरे<br>(अल्पसंख्याक दिनानिमित्ताने न. प. तुमसर येथे प्रतिपादन)

HomeNewsनागपुर डिवीजन

संविधानाने दिलेले अल्पसंख्याकांचे हक्क जपणे काळाची गरज… प्राचार्य राहुल डोंगरे
(अल्पसंख्याक दिनानिमित्ताने न. प. तुमसर येथे प्रतिपादन)

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा – कार्यालय नगर परिषद तुमसर दीनदयाल जन आजीविका योजना (शहरी) व वसुंधरा शहरस्तर संस्था, तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्याक कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद तुमसरच्या सभागृहात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. विलास माटे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य राहुल डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून पूजा लांजेवार (कार्यालय अधीक्षक) व यमु नागदेवे (प्रकल्प अधिकारी, नगर परिषद तुमसर) उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना प्रसिद्ध वक्ते प्राचार्य राहुल डोंगरे म्हणाले की, “अल्पसंख्याक म्हणजे केवळ संख्येने कमी असलेला समूह नव्हे, तर समाजाच्या मुख्य प्रवाहात अनेकदा दुर्लक्षित राहणारा घटक आहे. अशा घटकांना समान संधी, सुरक्षितता व विकासाचा हक्क मिळणे हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे.”
ते पुढे म्हणाले की, भारतीय संविधानातील अनुच्छेद २५ ते ३० अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे, शैक्षणिक संस्था चालविण्याच्या अधिकाराचे व सांस्कृतिक जतनाचे संरक्षण करतात. अल्पसंख्याकांचे हक्क जपले गेले, तरच भारताची “विविधतेत एकता” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल. संविधानाने दिलेले अल्पसंख्याकांचे हक्क जपणे ही काळाची गरज आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड. विलास माटे म्हणाले की, “हक्क म्हणजे विशेष सवलत नव्हे, तर सन्मानाने जगण्याची हमी आहे. भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून दुर्बलांच्या वेदनांना न्याय देणारा दस्तऐवज आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन यमु नागदेवे प्रकल्प अधिकारी यांनी केले. तर आभार प्रीती भोयर (समूह संसाधन व्यक्ती) यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती कावळे, लीना समरीत, माधुरी बिसने, वैशाली बनसोड, नलिनी खोब्रागडे, सुनीता कटरे, रेखा सोनवाणे, कविता नागमोते, आरती झुरमुरे, रोशनी सार्वे आदींनी विशेष सहकार्य केले.

COMMENTS

You cannot copy content of this page