देवाडा येथील अभिमन्यू मुंडे ची सीआरपीएफ मध्ये निवड.

HomeNewsचंद्रपूर

देवाडा येथील अभिमन्यू मुंडे ची सीआरपीएफ मध्ये निवड.

– शाळेच्या वतीने अभिमन्यु चा केला सत्कार.

गौतम नरी चौफेर //बादल बेले राजुरा २९ जुन बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळ, राजुरा द्वारा संचालित अब्दुल गणी पटेल विद्यालय तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, देवाडा  येथे इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थी अभिमन्यू ज्ञानेश्वर मुंडे ह्या विद्यार्थ्यांची सीआरपीएफ मध्ये निवड होऊन त्याने आपले प्रशिक्षण पूर्ण केले. व सुट्टी कालावधी मध्ये घरी परतताच शाळेला भेट दिली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश  गिरसावळे, कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य प्रदीप उपरे, स.शि. हिनेश जाधव, निलिमा सूर, दुर्गाश्री वाढई, शाळेचे लिपिक आकाश ढवळे, शिपाई प्रेमदेव मत्ते, मारोती गव्हारे, संदीप डाहूले आदी उपस्थित होते. यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिमन्यूचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शालेय जीवनापासून विवीध उपक्रमांत सहभागी होऊन स्वतःच्या कार्याची छाप पाडण्याऱ्या अभिमन्यू ची निवड ही शाळा, महाविद्यालयासाठी नक्कीच अभीमानास्पद आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page