गौतम नगरी चौफेर सौ सुवर्णा बादल बेले राजुरा:- प्रसिद्ध गझलकार दिलीप सीताराम पाटील यांच्या “मी शब्दांना मशाल करतो” या गझलसंग्रहास गडचिरोली येथील नाट्यश्री कलामंचाचा उत्कृष्ट गझलसंग्रहाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
सदर पुरस्कार गडचिरोली येथे दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी नाट्यश्री कलामंचाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे. अशी माहिती कलामंचाचे संयोजक चुडारामजी बल्हारपुरे यांनी दिली.
“मी शब्दांना मशाल करतो” हा दिलीप पाटील यांचा दुसरा गझलसंग्रह असून यापूर्वीही या संग्रहास विविध राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


COMMENTS