अभिनेता शहबाज खान यांच्या हस्ते प्रकाश सोनवणे यांना भारत बिजनेस अवार्ड पुरस्काराने लोणावळा येथे सन्मानित

HomeNewsचंद्रपूर

अभिनेता शहबाज खान यांच्या हस्ते प्रकाश सोनवणे यांना भारत बिजनेस अवार्ड पुरस्काराने लोणावळा येथे सन्मानित

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
नागपूर – देविदास ग्रुप अँड कंपनी संपूर्ण भारतातील उद्योजकांची ट्रेनिंग पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे दिनांक 14 ऑगस्ट 2025 ला आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये निवडक उद्योजकांना भारत बिजनेस अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये ब्लू स्टार्म टीव्ही न्यूज पुणे येथील मुख्य संपादक प्रकाश बळीराम सोनवणे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन अभिनेता शहबाज खान यांच्या हस्ते भारत बिजनेस अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र ब्ल्यू स्टार्मअसोसिएटचे महाराष्ट्र अध्यक्ष संजीव भांबोरे, अंकुश बळीराम सोनवणे ,आप्पासाहेब चव्हाण, अरुण वाघमारे यांनी, त्याचप्रमाणे त्यांच्या महाराष्ट्रातील असंख्य चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page