गौतम नगरी चौफेर (राजेश येसेकर भद्रावती तालुका प्रतिनिधी भद्रावती) : स्थानिक भद्रावती आंतर महाविद्यालयीन गोंडवाना विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा दिनांक 21 ऑक्टोंबर 2024 रोजी विवेकानंद महाविद्यालय बॉक्सिंग हॉल येथे पार पडली ही स्पर्धा विवेकानंद महाविद्यालय भद्रावती, या स्पर्धेकरिता गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत 15 महाविद्यालयातील एकूण 50 महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग नोंदविला स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे, प्रमुख पाहुणे राज्य क्रीडा बॉक्सिंग मार्गदर्शक विजय डोबाळे, प्राध्यापक खनके, प्राध्यापक देशमुख उपस्थित होते. या स्पर्धेकरिता तांत्रिक बाजू सांभाळणारे चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे तांत्रिक अधिकारी व पंच म्हणून विजय डोबाळे, वर्षा कोयचाळे, लता इंदूरकर, खुशाल माढाळे, पंकज शेंडे, प्रियंका मांढरे, पोर्णिमा शेंडे उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. संगिता आर. बांबोडे यांनी केले. ही पुरुषांचे 13 वजन गट आणि महिलांचे 12 वजन गट या प्रकारात घेण्यात आली. या स्पर्धेतील विजय खेळाडू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली विद्यापीठाचे प्रतिनिधित्व अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेला सहभाग करतील. या स्पर्धेच्या आयोजना करिता महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. संगिता आर. बांबोडे यांनी अथक परिश्रम घेतले. आंतर महाविद्यालयीन गोंडवाना विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा यशस्वी करण्याकरिता विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) द्वारा संचालित या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी, चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनाचे सर्व पदाधिकारी,भद्रावती तालुका बॉक्सिंग संघटनाचे सर्व पदाधिकारी, आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.
COMMENTS